सनातन धर्म विरोधात ‘हेटस्पीच’ हे अर्बन नक्षलवाद्यांच षडयंत्र; सुनील घनवट यांचा आरोप

सनातन धर्माविरोधात  ‘हेटस्पीच’ हे अर्बन नक्षलवाद्यांच षडयंत्र; सुनील घनवट यांचा आरोप

‘Hate speech’ against Sanatan Dharma is a conspiracy of urban naxalites; Sunil Ghanwat’s allegation

सनातन धर्म रक्षक अभियान सुरू  Sanatan Dharma Rakshak Abhiyan started

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onWed11 Oct24, 15.00Pm
By राजेंद्र सालकर

कोपरगाव : सनातन धर्मा विरोधात जाणीवपूर्वक ‘हेटस्पीच’ दिले जात आहे. हा अर्बन नक्षलवाद्यांच्या एका षडयंत्राचा भाग असल्याचा आरोप सनातन संस्थेचे महाराष्ट्र व छत्तीसगड राज्य संघटक सुनील घनवट यांनी बुधवारी प्रीती भोजनालय कोपरगाव येथील एका पत्रकार परिषदेत  केला.

सनातन धर्माला संपवण्याविषयीची भाषा वापरली जात आहे. उदयनिधी स्टॅलीन, प्रियांक खर्गे यांच्या सारखे मंत्री मंत्रीपदाची घेतलेली शपथ मोडून एका धर्म समुदायाची हेटाळणी करणारी भाषा वापरून डेंग्यू, मलेरिया, एचआयव्हीया  संसर्गजन्य रोगांशी तुलना करतात.ही अतिरेकी आणि अर्बन नक्षलवाद्यांची भाषा असल्याचे घनवट  म्हणाले. 
आपल्या देशात अभिव्यक्ती  स्वातंत्र्य असले तरी त्याला काही संविधानिक नियम आहेत. या नियमांची चौकटी मोडून हेटस्पीच केले जाते.ज्येष्ठ पत्रकार निखील वागळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड यांनी सनातन धर्म संपविण्याच्या भूमिकेला पाठिंबा घोषित केल्याचे घनवट यांनी सांगितले. त्यांच्या विरोधात  हेटस्पीचचा एकही गुन्हा दाखल झाला नाही. ३० गुन्हे  नोंदविल्याचे सांगितले जाते. यातील बहुतांश गुन्हे सकल हिंदू समाजाच्या हिंदू जन आक्रोश मोर्चातील हिंदुत्ववादी वक्तव्यांच्या विरोधात दाखल केले गेले आहेत. 
सर्वोच्च न्यायालयाने  आदेशात स्पष्ट म्हटले आहे की, जर कोणी ‘हेटस्पीट’ करून कोणत्याही समाजाच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न करेल, तर सरकारने तक्रारदाराची वाट न पहाता स्वतःच दखल घेवून प्राथमिक तक्रार दाखल केली पाहिजे. या सरकारने विलंब केल्यास त्याला सर्वोच्च न्यायालयाचा अवमान मानले जाईल.इतका स्पष्ट आदेश असतानाही सनातन धर्माबाबत ‘हेडस्पीच’ करणाऱ्यांविरुद्ध अद्याप गुन्हे दाखल का करण्यात आले नाही, असा प्रश्न घनवट  यांनी उपस्थित केला. 
यापुढे सनातन धर्म रक्षणासाठी ‘मी सनातन धर्मरक्षक’ ह अभियान राबविणार असल्याचे सांगून त्यांनी जनजागृती, व्याख्याने, बैठका घेण्यासोबतच ‘हेटस्पीच’ करणाऱ्यांविरुद्ध पोलिस तक्रारी करण्यात येणार असल्याचे सांगितले.यासाठी महाराष्ट्रातील सनातनधर्मी हिंदू समाजाने सजग होण्याची आणि लोकशाही मार्गाने या सनातन धर्मविरोधी वक्तव्यांचा प्रतिवाद करण्याची आवश्यकता आहे, असे आवाहन  सुनील घनवट यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने केले. 
घनवट पुढे म्हणाले की  सहिष्णुता, बंधुत्व आणि विश्वकल्याण यांच्यासाठी सुपरिचित असणारा सनातन धर्म नष्ट करण्यासाठी अर्बन नक्षलवाद्यांकडून सातत्याने षडयंत्रे चालू आहेत. सर्वप्रथम जे.एन.यु. मध्ये ‘भारत तेरे टुकड़े होंगे’च्या देशविरोधी घोषणा दिल्या गेल्या. त्यानंतर ‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ नावाने हिंदुत्व संपवण्यासाठी परिषदा घेतल्या गेल्या. त्या वेळी विरोध झाल्यावर ‘आम्ही हिंदु धर्माच्या विरोधात नाही, तर राजकीय सावरकरांचा हिंदुत्वाच्या विरोधात आहोत’, असा बुद्धीभेद करणारा खुलासा केला गेला; मात्र आता तर ‘सनातन धर्म’ संपवण्याचीच भाषा केली जात आहे.
पाहुण्यांचा परिचय दिलीप सारंगधर यांनी करून दिला  तर  प्रास्ताविक  प्रदीप देशमुख यांनी केले.  
या पत्रकार परिषदेला  हिंदू जागृती समिती महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक सुनील घनवट, हिंदू जनजागृती समिती प्रदीप देशमुख,  ॲड. राजेंद्र वाघ, दिलीप सारंगधर, शिवप्रतिष्ठानचे अक्षय महाजन, सौ. वनिता आव्हाड, कुमारी राजश्री देशपांडे,  सौ निर्मला सारंगधर   आदींची उपस्थिती होती.
सनातन धर्माबाबत अतिशय खालच्या स्तरावर जाऊन टीका केली जात आहे. त्या विरोधात ‘मी सनातन धर्मरक्षक’ हे अभियान सुरु झाल्याचे त्यांनी सांगितले. या अंतर्गत जागृतीसोबत धर्मविरोधी शक्तींचा लोकशाही मार्गानि विरोधही केला जाणार आहे. कोपरगाव सह नगर जिल्ह्यात नगर शहरा, नेवासा श्रीरामपूर या तालुक्यांत सनातन धर्माच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्ये करणायांच्या विरोधात  प्रत्येक ठिकाणी जाऊन पोलिस तक्रारी देणार असल्याचे  हिंदू जनजागृती समितीचे प्रदीप देशमुख  म्हणाले.

आज कोपरगावात व्याख्यान

सनातन धर्माविरोधात अर्बन नक्षलवादी विचारातून सुरू असलेल्या ‘हेटस्पीच’विरुद्ध जनजागृती करण्यासाठी हिंदू जनजागरण समितीच्या वतीने कोपरगाव येथे आज बुधवारी  सायंकाळी ५ वाजता कृष्णाई बँक्वेट हॉल छत्रपती संभाजी महाराज चौक  येथे सुनील घनवट यांचे   ‘सनातन हिंदू धर्म नष्ट करण्याच्या षडयंत्रामागे कोण?’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page