नॅशनल शुगर इन्स्टीटयुटतर्फे कोल्हेकारखान्यास राष्ट्रीयस्तर ‘सर्वोत्कृष्ट उद्योजकता पुरस्कार’ प्रदान 

नॅशनल शुगर इन्स्टीटयुटतर्फे कोल्हेकारखान्यास राष्ट्रीयस्तर ‘सर्वोत्कृष्ट उद्योजकता पुरस्कार’ प्रदान 

Kolhekarkhanas awarded national level ‘Best Entrepreneurship Award’ by National Sugar Institute

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onSat14 Oct24, 15.50Pm
By राजेंद्र सालकर

कोपरगाव : नॅशनल शुगर इन्स्टीटयुट (एन. एस. आय.) कानपुरच्यावतीने साखर उद्योगात सातत्याने नाविन्यपुर्ण प्रयोग करून उत्पादनांत सातत्य ठेवल्याबददल यंदाचा राष्ट्रीय स्तरावरील ‘सर्वोत्कृष्ट  उद्योजकता पुरस्कार’ नगर जिल्ह्यातील अग्रणी सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याला देण्यात आला. 

 १२ ऑक्टोंबर रोजी  साखर उद्योग परिषदेत अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाचे मुख्य सचिव  संजीव चोपडा व नॅशनल शुगर इन्स्टीटयूटचे संचालक  नरेंद्र मोहन यांच्या हस्ते संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे व संचालक मंडळास हा पुरस्कार लखनौ येथे नुकताच प्रदान करण्यात आला.
कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे व बिपिन कोल्हे यांनी हा पुरस्कार  संस्थापक माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे व सभासद शेतक-यांना अर्पण केला.
याप्रसंगी कारखान्याचे उपाध्यक्ष मनेष गाडे, संचालक  ज्ञानेश्वर परजणे, बापूसाहेब बारहाते, बाळासाहेब वक्ते, रमेश आभाळे, रमेश घोडेराव, राजेंद्र कोळपे, ज्ञानेश्वर होन, विलासराव माळी, सतिष आव्हाड, बाळासाहेब पानगव्हाणे, मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव जी. सुतार, उत्पादन प्रमुख विवेककुमार शुक्ला, कार्मिक अधिकारी (वर्क्स मॅनेजर) विश्वनाथ भिसे आदि उपस्थित होते.

 माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी देश विदेशातील साखर उद्योगाचा अभ्यास करून येथील साखर उद्योगात आधुनिकीकरणाला विशेष महत्व देत अमुलाग्र बदल घडवुन आणले. बदलत्या मुक्त अर्थव्यवस्थेत सहकारी साखर कारखानदारीवर अवलंबुन असणारा शेतकरी सभासद व अन्य घटकांची आर्थीक क्रयशक्ती कशी वाढेल यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले त्यांच्यामुळेच सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांस राष्ट्रीय व राज्य स्तरावरील असंख्य पुरस्कार मिळालेले आहेत.- बिपिन कोल्हे अध्यक्ष संजीवनी उद्योग समिती

 नॅशनल शुगर इन्स्टीटयुट कानपूर व्यवस्थापनाने आमचा जो सन्मान केला तो अलौकीक आहे, तसेच राष्ट्रीय स्तरावर भारत सरकारच्यावतीने देण्यांत आलेला सहकारी साखर कारखानदारीतील एकमेव पुरस्कार असुन संस्थेवर सर्व सभासदांनी केलेल्या विश्वासाचे प्रतिक – विवेक कोल्हे अध्यक्ष कोल्हे कारखाना, कोपरगाव

Leave a Reply

You cannot copy content of this page