श्री रेणुकामाता मंदिर विकास व गावातील विविध प्रलंबित प्रश्नासाठी सर्वतोपरी सहकार्य करू,- स्नेहलता कोल्हे
We will do our best for the development of Sri Renukamata temple and various pending issues in the village, – Snehalata Kolhe
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onMont16 Oct24, 19.20Pm
By राजेंद्र सालकर
कोपरगाव : कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील उक्कडगाव येथील श्री रेणुकामाता मंदिर हे एक जागृत देवस्थान असून, येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविता आला, हे गाव आज टँकरमुक्त झाले याचे मला खूप समाधान आहे. यापुढील काळातही श्री रेणुकामाता मंदिराच्या विकासासाठी व गावातील विविध प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी आपण नेहमीच सर्वतोपरी सहकार्य करू, अशी ग्वाही कोपरगाव माजी आमदार तथा स्नेहलता कोल्हे यांनी रविवारी (१५) रोजी उक्कडगाव येथे नूतन सामाजिक सभागृहात नवरात्र उत्सव प्रसंगी केले.
यावेळी त्यांनी देवीची आरती केली व घटी बसलेल्या माता-भगिनींसोबत देवीची आराधना करून त्यांनी फराळाचे वाटप केले. कोपरगाव मतदारसंघातील प्रत्येक नागरिक बंधू-भगिनींच्या व शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक भरभराट, सुख, समृद्धी येऊ दे, सर्वांना उदंड निरोगी आयुष्य लाभू दे, अशी प्रार्थना स्नेहलताताई कोल्हे यांनी यावेळी श्री रेणुकामातेच्या चरणी केली.
याप्रसंगी कलावती कोल्हे, मनाली कोल्हे, निकिता कोल्हे, श्रद्धा कोल्हे व कोल्हे कुटुंबातील इतर सदस्य, सखाराम निकम, बबनराव निकम, रेवणनाथ निकम, चौधरी, सोनवणे, देविदास शिंदे, सरपंच विकास निकम, ज्ञानेश्वर निकम, साहेबराव सिनगर, हेमंत निकम, कोमल जाधव आदींसह सर्व ग्रामपंचायत सदस्य, विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, ग्रामस्थ व भाविक-भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्नेहलता कोल्हे म्हणाल्या, श्री रेणुकामाता हे कोल्हे कुटुंबीयांचे कुलदैवत असून, उक्कडगावच्या श्री रेणुकामातेवर आम्हा कोल्हे कुटुंबीयांची अपार श्रद्धा आहे. दरवर्षी नवरात्रोत्सवात संपूर्ण कोल्हे कुटुंबीय उक्कडगाव येथे श्री रेणुकामातेच्या दर्शनासाठी, आरती व पूजेसाठी येत असते. माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, युवा नेते विवेक कोल्हे यांनी व आपण स्वत: उक्कडगाव ग्रामस्थांचे प्रश्न सोडविण्यासाठी कायमच पुढाकार घेतला आहे. श्री रेणुकामाता मंदिरात प्रत्येक वर्षी नवरात्रोत्सव काळात मोठ्या संख्येने भाविक-भक्त महिला घटी बसतात. त्यांच्या सोयीसाठी आपण या ठिकाणी सामाजिक सभागृह मंजूर केले. जागेची अडचण असल्याने अनेक दिवस सभागृहाचे काम प्रलंबित होते; पण देविदास शिंदे यांनी सभागृहासाठी मोफत जागा उपलब्ध करून दिल्यामुळे अखेर हे काम मार्गी लागले आहे याचा आनंद आहे. या सभागृहामुळे नवरात्रोत्सव काळात घटी बसणाऱ्या माता-भगिनींची सोय झाली आहे. येथे स्वच्छतागृहाचीही व्यवस्था केली गेली असून, सभामंडपाचे काम पूर्ण झाले आहे.
चौकट
श्री रेणुकामाता मंदिराच्या विस्तारीकरणाचे कामही प्रगतिपथावर आहे. उक्कडगाव येथे ग्रामपंचायतच्या वतीने २० लाख रुपये खर्चून भव्य मंगल कार्यालय बांधण्यात येणार असून, त्यामुळे गावकऱ्यांची व आसपासच्या गावातील लोकांची चांगली सोय होणार आहे.
Post Views:
185