समता स्कूल विद्यार्थ्यामध्ये परदेशीय स्कॉलरशिप मिळविण्याची क्षमता – कुलदीप कोयटे
Samata School student’s ability to get foreign scholarship – Kuldeep Koyte
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onFir27 Oct24, 19.00Pm
By राजेंद्र सालकर
कोपरगाव : शकते.अमेरिका, इंग्लंड, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, जर्मनी या देशातील हॉवर्ड,केंब्रिज यांसारख्या विद्यापीठांमध्ये शिक्षण घेण्यासाठी मोठ्या स्कॉलरशिपची आवश्यकता असते ही स्कॉलरशिप केवळ शैक्षणिक गुणवत्तेमुळे मिळू शकते. अशी परदेशीय स्कॉलरशिप मिळवण्याची क्षमता समता इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांमध्ये असल्याचे गौरवउद्गार कुलदीप कोयटे यांनी विद्यार्थ्यांना ‘परदेशातील शिक्षण पद्धती व करिअरच्या संधी’ या विषयावर मार्गदर्शन करताना व्यक्त केले .
कुलदीप कोयटे पुढे म्हणाले की, शिक्षण हे प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील अविभाज्य घटक आहे. यामुळे त्याच्या जीवनाला कलाटणी मिळत असते. उच्च प्रकारचे शिक्षण घेऊन आवडीच्या क्षेत्रात करिअर करण्याची संधी प्रत्येक जण शोधत असतो. परदेशात शिक्षण घेण्यासाठी सुसंवाद कौशल्ये, स्वतःहून अभ्यास करण्याची तयारी, शिस्त, संस्कार महत्वाचे आहेत. भारतीय संस्कृती आणि तेथील संस्कृतीशी मेळ घालणारे शिक्षण व ती तयारी समता इंटरनॅशनल स्कूलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांकडून करून घेतली जाते. म्हणूनच समता इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांना परदेशातील शिक्षण आणि करिअर करण्याच्या उत्तम संधी उपलब्ध आहे.असा सल्ला त्यांनी दिला.
अर्धा तास चाललेल्या शंका समाधानात विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची कुलदीप कोयटे यांनी सविस्तर उत्तरे दिली.
सुत्रसंचालन शिक्षिका जलीश शाद यांनी केले. प्राचार्या सौ.हर्षलता शर्मा यांनी कुलदीप कोयटे यांचा सन्मान केला. या वेळी समता इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्या सौ. हर्षलता शर्मा, विद्यार्थी, शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांचे आभार शिक्षिका शोभा गद्री यांनी मानले.
Post Views:
110