जायकवाडी धरणाला पाणी जाऊ देणार नाही ; ‘पक्ष झेंडे गुंडाळून ठेवा, एकोपा दाखवा – स्नेहलता कोल्हे 

जायकवाडी धरणाला पाणी जाऊ देणार नाही ; ‘पक्ष झेंडे गुंडाळून ठेवा, एकोपा दाखवा – स्नेहलता कोल्हे 

Jayakwadi Dam will not allow water to flow; ‘Keep the party flags rolled up, show unity – Snehlata Kolhe

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Fir 3Nov24, 18.20PmBy राजेंद्र सालकर

कोपरगाव : गोदावरी खोऱ्यातील धरणातून जायकवाडीसाठी पाणी जाऊ देणार नाही, अशी भूमिका आपण घेतली आहे. तेंव्हा’पक्ष, झेंडे गुंडाळून ठेवा, एकोपा दाखवा, सर्व राजकीय पक्षांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन  माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी शुक्रवारी (३) रोजी  तहसील कार्यालयासमोर गोदावरी खोरे पाणी कृती समितीच्या वतीने आयोजित लाक्षणिक आंदोलनात बोलताना केले. 

    
स्नेहलता कोल्हे पुढे म्हणाल्या की,  जायकवाडी धरणात  आता  पाणीसाठा चांगला आहे. जायकवाडीतून शेतीची आवर्तने सोडण्यात आली. पिण्याच्या पाण्याची अडचण नसताना जिल्ह्यातील धरणातून पाणी सोडण्याचा अट्टहास का केला जातो. आता पाणी सोडण्यास आपला विरोध आहे. सरकारला जाग आणण्यासाठीच आपले हे लाक्षणिक उपोषण असल्याचे त्या म्हणाल्या,  एकाची ताण भागवायची आणि दुसऱ्याला तहानलेले ठेवायचे, आपल्याला कंगाल करून तिकडे सुबत्ता आणायची एक असंतोषाचे कारण आहे अति तुटीचे खोरे असताना वाटा घेण्याचा निर्णय दुर्दैवी आहे  शेतकरी अडचणीत असून कोणी निर्णय घेणार असेल तर  सरकारने याचा फेरविचार करावा  पाणी सोडून नुकसान करण्यापेक्षा मृतसाठ्यातून पाच टीएमसी पाणी वापरण्याची परवानगी द्यावी  दुसरीकडे अनाधिकृत उत्साहाचा हिशोब नाही  आमच्या तोंडचे पाणी पळाले डोळ्यात पाणी आले,  आमदार साहेब झोपेत राहू नका किंवा झोपेची सोंग घेऊ नका, बक्षिसाने बाजारपेठ फुलणार नाही,  बळीराजा सुखी करा तरच सुबत्ता येईल,   पाणी नाही, पाऊस नाही, अधिकारी नाही, आम्हाला कोणीच वाली नाही या विरुद्ध आपला लढा आहे. आता बोलण्यापेक्षा जनरेटयासाठी  जनजागृती करावी लागेल. संघर्ष केला तरच आपल्याकडे लक्ष दिले जाईल उपोषणाची ताकद काय असते हे आपण आता पाहिले आहे ते नव्याने सांगण्याची गरज नाही. तेंव्हा एकोपा ठेवा, पक्ष झेंडे गुंडाळून ठेवा त्यासाठी आपण मोठ्या स्वरूपाचे आंदोलन उभारणार आहोत, असा इशाराही स्नेहलता कोल्हे यांनी  दिला.
यावेळी विवेक कोल्हे म्हणाले, समृद्धी महामार्गासारखा ड्रीम प्रोजेक्ट अल्पावधीत होऊ शकतो  राजकीय इच्छाशक्ती असेल तर पश्चिमेचे पाणी पूर्वेला येऊ शकते काही हजार कोटीची आवश्यकता आहे. २५ टीएमसी पाणी आले. तर नगर नाशिक मराठवाडा हा प्रादेशिक वाद मिटू शकतो. मात्र यासाठी नगर नाशिक मराठवाडा यांनी एकत्र येऊन लढा उभारण्याची गरज आहे.गोदावरी खोऱ्यातील पाणी विदर्भापर्यंत जाते  ४०% शेती सिंचन यातून होते सरकारने हे काम जर केले तर शेतकऱ्यांचे आशीर्वाद त्यांना मिळाल्याशिवाय राहणार नाही. पाणी संघर्षाचा इतिहास पाहिल्यास माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांनी तालुक्यात मतदार संघाच्या पाण्यासाठी व शेतकऱ्यांसाठी स्वतःच्या सरकार विरोधात लढा दिलेला आहे. पाणी प्रश्न सुटत नसल्याने प्रसंगी स्वतःचा पक्ष सोडून पक्ष त्याग  केला आहे. आज जरी सरकार  आमच्या  विचाराचे असले तरी  आम्ही सत्तेत नाही. तसेही  हक्काच्या व्यक्तीकडेच हट्ट केला जातो. रडल्याशिवाय आई सुद्धा बाळाला दूध पाजत नाही.  आवाज उठविल्याशिवाय आम्हाला न्याय मिळणार नाही.  शेतकऱ्याचे हित आणि शेतकऱ्याकडे लक्ष देईल तोच आमचा पक्ष म्हणून विनंती आहे की,  सणासुदीचे दिवस आहेत. आम्हाला न्याय द्या,  शेतकऱ्याला जात  नसते त्याला पाणी हवे आहे यासाठी प्रसंगी आमची  मंत्रालयावर धडकण्याची सुद्धा आमची तयारी आहे. 
गोदावरी कृती पाणी समितीच्या ध्वज
जायकवाडी धरणांत उर्ध्व गोदावरी खो-यातुन पाणी सोडण्याबाबत घेतलेल्या निर्णयाचा निषेध म्हणून ( दि. ३ नोव्हेंबर) रोजी कोपरगाव तहसिल कार्यालय समोर  लाक्षणिक उपोषणातील मागण्यांचे निवेदन नाशिक पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे यांना निवेदन देण्यात आले यावेळी तहसीलदार संदीप कुमार भोसले  वैशाली साळुंखे, वैशाली आढाव उपस्थित होत्या.
या निवेदनात पुढील मागण्या करण्यात आल्या यात• मेंढेगिरी समिती कालबाहय झालेली आहे त्यासाठी जो अभ्यासगट नेमण्यांत आलेला आहे, त्याचा अहवाल आल्याशिवाय उर्ध्व गोदावरी खो-यातील धरण समुहातुन जायकवाडीसाठी पाणी सोडण्यांत येवु नये., व यावर्षी जायकवाडी साठी कमतरता असलेले ५ टी एम सी पाणी मृत साठयातुन वापरण्यांस शासनाने परवानगी द्यावी.
गोदावरी कालवे लाभक्षेत्रात अत्यल्प पर्जन्यमान झाल्यांने शेती, पिण्यांचे पाणी, पशुधन यासाठी जी आर्वतने द्यावी लागणार आहे त्यात पाण्यांचे प्रचंड लॉसेस (व्यय) होणार असल्यांने पाण्यांची प्रचंड प्रमाणांत तुट निर्माण होणार आहे त्यामुळे मुळातच तुट असलेल्या क्षेत्रातुन जायकवाडीसाठी पाणी सोडण्यांत येवु नये.
उर्ध्व गोदावरी खोरे हे अतितुटीचे आहे. त्यामुळे अगोदर नविन पाणी साठे निर्माण करावे व त्यानंतरच पाण्यांचे वाटप करावे, तुटीच्या पाण्यांचे वाटप करू नये.
• जायकवाडी धरणाच्या फुगवटयातुन जो अनिर्बंधपणे पाण्यांचा उपसा होतो तो रेकॉर्डवर येत नाही तो बाष्पीभवनांत गृहीत धरला जातो. त्यावर वरिष्ठ पातळीवरून निर्बंध लावण्यांत यावे व ते पाणी उपलब्ध पाण्यांच्या हिशोबात धरण्यांत यावे.
• नगर नाशिक, विरूध्द मराठवाडा असा प्रादेशिक पाण्यांचा वाद कायमस्वरूपी मिटविण्यांसाठी अप्पर वैतरणातुन समुद्रास वाहुन जाणारे अतिरिक्त पाणी सॅडल गेट द्वारे त्वरीत मुकणे धरणांत वळवून अप्पर वैतरणा धरणाची पाणीसाठवण क्षमता वाढवावी.
• सहयाद्री पर्वत माथ्यावरील पश्चिमेचे अतिरिक्त समुद्राला वाहुन जाणारे पाणी पुर्वेकडे ३० वळण बंधा-याद्वारे तातडीने गोदावरी खो-यात वळविण्यासाठी उपाययोजना राबवाव्यात.
• कृष्णा खो-याच्या धर्तीवर पश्चिम वाहिन्या, नार पार, दमणगंगा, पिंजाळ, वैतरणा, उल्हास खो-यातील समुद्राला वाहुन जाणारे अतिरिक्त पाणी पुर्वेकडे गोदावरी खो-यात आणण्यासाठी युध्द पातळीवर नियोजन करावे.
• गोदावरी कालवा सल्लागार समितीची बैठक तातडीने घेवुन गोदावरी कालवे लाभक्षेत्रातील शेती व पिण्यांचे नियोजन जाहिर करावे. त्याचप्रमाणे गोदावरी कालवे व वितरीका यांची नुतणीकरणाची कामे तातडीने पुर्ण करण्यांत यावीत.
• गोदावरी कालवे लाभक्षेत्रातील लाभधारक शेतक-यांचे रद्द केलेले ब्लॉक पुर्नस्थापीत करून लाभधारक शेतक-यांना बारमाही सिंचनाचा लाभ मिळावा. आदी मागण्या करण्यात आलेल्या आहेत. 
यावेळी मनेष गाडे,  सौ. स्नेहलता  कोल्हे, विवेक  कोल्हे,बाळासाहेब  वक्ते, अनिल सोनवणे, बबनराव निकम, दिलीप बनकर, भास्करराव सुराळे, दत्तात्रय  काले, दिलीप दारुणकर, दिपक चौधरी,संजय सातभाई, शरदराव थोरात,साहेबराव  रोहोम, केशवराव भवर,राजेंद्र सोनवणे,संचालक रमेश घोडेराव, विश्वासराव महाले, बाळासाहेब वक्ते, ज्ञानेश्वर परजणे, बापूसाहेब बारहाते, नीलेश देवकर, अप्पासाहेब दवंगे, राजेंद्र कोळपे, रमेश आभाळे, ज्ञानेश्वर होन, विलासराव वाबळे, विलासराव माळी, सतीश आव्हाड, निवृत्ती बनकर, बाळासाहेब पानगव्हाणे, संजय औताडे, माजी उपाध्यक्ष अरुणदादा येवले, संजय होन, साईनाथ रोहमारे, मधुकर वक्ते,
विजय रोहोम,प्रदिप नवले, कैलास जाधव, रविंद्र पाठक, बबलू वाणी,अतुल काले, हशमभाई पटेल,अंबादास देवकर,  बाळासाहेब मांजरे,  राजेंद्र गायकवाड,  दीपक गायकवाड, मच्छिंद्र केकाण, उत्तमराव चरमळ,अविनाश पाठक,  योगेश बागुल, विजय वाजे, स्वप्नील निखाडे, माजी नगरसेवक बबलू वाणी, संदीप देवकर, अतुल काले, संजय जगदाळे, अशोक लकारे, जनार्दन कदम, दीपक जपे, वैभव गिरमे, नसीर सय्यद, गोपीनाथ गायकवाड, विवेक सोनवणे, कैलास खैरे, वैभव आढाव, सुशांत खैरे, प्रसाद आढाव, दादासाहेब नाईकवाडे, चंद्रकांत वाघमारे, खालिक कुरेशी, फकिर मोहम्मद पैलवान, इलियास खाटिक, अल्ताफ कुरेशी, सरपंच डॉ. विजय काळे, रवींद्र आगवन, यादवराव संवत्सरकर, भीमा संवत्सरकर, मुकुंद काळे, दीपक चौधरी, सचिन सावंत, पिंटू नरोडे, जयेश बडवे, पिंकी चोपडा, शंकर बिऱ्हाडे, जयप्रकाश आव्हाड, संतोष नेरे, मुन्ना दरपेल, सिनू भाटिया, सिद्धार्थ साठे, रोहित कनगरे, सतीश निकम, विक्रांत सोनवणे आदींसह संजीवनी उद्योग समुहातील विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी, शेतकरी, भाजप, शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौकट

 हे सर्व घडत असताना लोकप्रतिनिधीचा वचक राहिला नसल्यामुळे प्रशासनात उदासीनता आली आहे. पाणी असो की, पिक विमा याबाबत लोकप्रतिनिधीची कृती नैराश्यपुर्ण  व  खेदजनक आहे-विवेक कोल्हे 

 

चौकट

 पाण्यासाठी लढाईचे हे तर पुण्याचे काम आहे. लढाईचे भिडायचे कसे हे कोल्ह्यांच्या मावळयांना सांगण्याची  गरज नाही. माझ्या सरकारपेक्षा माझी माणसे आणि जनतेसाठी  माझी खुर्ची अशी  भूमिका हवी – सौ. स्नेहलता कोल्हे

Leave a Reply

You cannot copy content of this page