स्नेहलता कोल्हे यांचे खोपडी येथे खंडोबा दर्शन; ह.भ.प. रामगिरी महाराजांच्या काल्याच्या कीर्तनाचा लाभ घेतला
Snehalata Kolhe’s Khandoba Darshan at Khopdi; H.B.P. Took advantage of Ramgiri Maharaj’s Kaliya Kirtan
येळकोट येळकोट जय मल्हार!Yelkot Yelkot Jai Malhar!
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Tue19 Dec 23, 17.20Pm.By राजेंद्र सालकर
कोपरगाव: स्नेहलता कोल्हे यांनी चंपाषष्ठीला खोपडी येथे जाऊन खंडेरायाचे दर्शन घेतले. यावेळी चंपाषष्ठीच्या निमित्ताने खोपडी येथील श्री खंडोबा देवस्थानमध्ये आयोजित अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सांगता सोहळ्यात ह.भ.प. रामगिरी महाराजांच्या काल्याच्या कीर्तनाचा लाभ घेतला.
यावेळी स्नेहलता कोल्हे म्हणाल्या, मार्गशीर्ष महिन्यात ‘शुद्ध षष्ठी’ ही तिथी ‘चंपाषष्ठी’ म्हणून साजरी केली जाते. चंपाषष्ठीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व असून,या दिवशी कुलधर्म कुलाचाराचा विधी करतात. कांदे-वांगे, भरीत रोडग्याचा नैवेद्य करतात. श्री खंडोबा महाराजांना तळी भरतात. मग महानैवेद्य दाखवतात. चंपाषष्ठीसारखे विविध सण, उत्सव हा एक संस्कार व विचार आहे. यातून अध्यात्मिक वारसा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे चालत राहिला पाहिजे. महंत ह.भ.प. रामगिरी महाराज यांच्यासह सर्व संत-महंत कीर्तन व प्रवचनातून समाजाची, देशाची व धर्माची सेवा करत आहेत. हे पुण्याचे काम आहे. हा राष्ट्रधर्म आहे. हे धार्मिक कार्य यापुढेही अखंड सुरू राहिले पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.
यावेळी सरपंच विठाबाई वारकर, उपसरपंच गोविंद नवले, मोहनराव जाधव, रमेश नवले, जयराम वारकर, अशोकराव नवले, संजय भवर, ज्ञानेश्वर पवार, चांगदेव नवले, सोमनाथ भवर, बाळासाहेब नवले, सोमनाथ रायते, जगन्नाथ नवले, अक्षय वारकर, किशोर पवार, प्रमोद सिनगर, देवराम मंचरे, अण्णासाहेब जाधव यांच्यासह असंख्य भाविक-भक्त, खोपडी व पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.
Post Views:
76