समता पतसंस्थेने पार केला नऊशे कोटी ठेवींचा टप्पा -संदिप कोयटे 

समता पतसंस्थेने पार केला नऊशे कोटी ठेवींचा टप्पा -संदिप कोयटे 

Samata Credit Union has crossed the milestone of 900 crore deposits -Sandip Koyte

सोनेतारण कर्ज वाटपामध्ये नवा विक्रमA new record in Sonetaran loan disbursement

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Thu 2Jan 24, 19.20Pm.By राजेंद्र सालकर

कोपरगाव : येथील समता पतसंस्थेने ३१ डिसेंबर २३ रोजी  ठेवींचा नऊशे कोटी रूपयांचा टप्पा पार केला.अशा प्रकारे संस्थेची आर्थिक परिस्थिती अतिशय सक्षम आहे. त्यामुळे संस्थेचे आर्थिक व्यवहार दिवसेंदिवस वाढत असून संस्था प्रगतीपथावर आहे.अशी माहिती संस्थेचे संचालक संदीप कोयटे यांनी दिली. सहकारी पतसंस्था चळवळीत ठेवींच्या हा एक विक्रम मानला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

संदिप कोयटे म्हणाले,  डिसेंबर २३ अखेर ९०० कोटी रूपयांच्या ठेवी संस्थेकडे आहेत. या आर्थिक वर्षात६८७ कोटी रुपये कर्ज वितरण व २४४ कोटी रुपयांची गुंतवणूक असून एकूण कर्ज वाटपात ३५३ कोटी रुपयांचे  सोनेतारण कर्ज वाटपामध्ये नवा विक्रम केला आहे. लिक्विडिटी बेस्ड प्रोटेक्शन स्कीम अंतर्गत ९९.७१ टक्के ठेवीदारांच्या प्रत्येकी २५ लाख रुपयांपर्यंतच्या ठेवी पूर्णपणे सुरक्षित आहे. संस्थेने तरलतेचे प्रमाण योग्य पद्धतीने राखले आहे. त्यापेक्षा अधिक गुंतवणूक करण्यात आली आहे.

संस्थेविषयी अधिक माहिती देताना संदीप कोयटे म्हणाले शिक्षण क्षेत्रात कार्यकारी विश्वस्त सौ. स्वाती कोयटे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव, शिर्डी, राहता, वैजापूर, श्रीरामपूर तालुक्यातील हजारो मुले शिक्षण घेत आहे. कोपरगाव शहरातील निवारा परिसरात असणाऱ्या स्व. दादाप्पा खंडाप्पा कोयटे विद्यालयात  शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. सुहासिनी कोयटे यांच्या मार्गदर्शना खाली  शेकडो अल्प उत्पन्न असलेल्या पालकांची मुले  शिक्षण घेत आहेत.

समता चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून शिर्डी येथे ‘साई आश्रया’ या अनाथ आश्रयालयात १५० च्या वर निराधार, अनाथ, गरजू मुले – मुली व ७० वयोवृद्ध आनंदाने, गुण्या – गोविंदाने राहत असून गणेश दळवी हे यांची देखभाल करत आहेत. तसेच कोपरगाव शहरातील निराधार, अनाथ, गरजू, अंध व्यक्तींना  घरपोहच मोफत जेवणाचे डबे पुरविले जातात. संस्थेच्या प्रत्येक वर्षाच्या आर्थिक नफ्यातून  नागरिकांच्या हिताच्या विविध सामाजिक  क्षेत्रातही ठसा उमटविलेला आहे.

कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ व कोपरगाव तालुका किराणा मर्चंट असोसिएशन यांच्या सहकार्याने कोपरगाव बस स्थानक सुशोभीकरण करण्यात आलेले आहे. या सर्व सामाजिक कामात समता पतसंस्थेचे संचालक, सभासद, ठेवीदार, कर्जदार, हितचिंतक, संस्थेचे अधिकारी, कर्मचारी आदींचे महत्वपूर्ण योगदान असून कोयटे परिवाराचा ही खारीचा वाटा असल्याचे संस्थेचे जनरल मॅनेजर सचिन भट्टड यांनी सांगितले.

समता नागरी सहकारी पतसंस्थेची २०२३ ची आर्थिक स्थिती आढावा बैठक संस्थेचे चेअरमन काका कोयटे यांच्या अध्यक्षतेखाली स्व.मोहनलाल आनंदराम झंवर सभागृहात संस्थेचे संचालक जितूभाई शहा, अरविंद पटेल, रामचंद्र बागरेचा, चांगदेव शिरोडे, कांतीलाल जोशी यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.

Leave a Reply

You cannot copy content of this page