महिलांनी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होणे ही स्री शक्तीची क्रांती – स्नेहलता कोल्हे
Economic independence of women is a revolution of Sri Shakti – Snehlata Kolhe
गृहउद्योगातील उत्कृष्ट महिला कामगारांचा सन्मानHonoring outstanding women workers in home industries
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Thu 2Jan 24, 19.30Pm.By राजेंद्र सालकर
कोपरगाव : सरकारने महिलांचे जीवनमान उंचावण्यासाठी उद्योगाच्या दिलेल्या संधीचा पुरेपूर फायदा घेऊन महिलांनी आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होणे ही स्त्री शक्तीची क्रांती असल्याचे प्रतिपादन माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी एका गृह उद्योगातील उत्कृष्ट महिला कामगारांच्या सन्मान प्रसंगी केले.
सौ स्नेहलता कोल्हे पुढे म्हणाले की अनेक उद्योजकांनी, मोठमोठ्या कंपन्यांनी जिद्द, चिकाटी व परिश्रमाच्या बळावर शून्यातून नवनिर्मिती करत गगनभरारी घेतल्याची उदाहरणे आहेत.अनेक महिलांनी छोट्या गृहउद्योगापासून मोठ्या उद्योगापर्यंत मजल मारली आहे. कोपरगाव तालुक्यात उद्योगाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. कोणत्याही संकटाला न घाबरता आत्मविश्वासाने व धैर्याने परिस्थितीला सामोरे जाऊन काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी स्नेहलता कोल्हे कोल्हे यांच्या हस्ते कामगार निर्मला वैद्य, शोभा राठोड, अकोलकर, ताराबाई पेंढारे, प्रतिभा पाटील, कविता धारक, अश्विनी गायकवाड, ज्योती पवार, सरला जाधव, वंदना शिंदे, ज्योती मोरे, जयश्री खानापुरे या उद्योगातील उत्कृष्ट महिलांचा सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी उद्योजक रोहित काले, रेणुका काले, विनय काले दगुराव चौधरी, संचालक रमेश घोडेराव, दीपक चौधरी, सरपंच वरुणा चौधरी, उपसरपंच गणेश थोरात, रमाकांत वाकचौरे, सोपानराव वहाडणे, संपतराव वहाडणे, दीपक सुरे, अंबादास देवकर, संदीप चौधरी, संदीप थोरात, दीपक वाघ, ‘ उद्योग’चे व्यवस्थापक उमेश मोरे, ललित केदारी, कुणाल नेरकर, योगेश वाडेकर आदींसह महिला बचत गटाच्या सभासद व ग्रामस्थ उपस्थित होते.
चौकट…
कोपरगाव तालुक्यात संजीवनी स्वयंसहाय्यता महिला बचत गटाच्या माध्यमातून असंख्य महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवून त्यांच्या कुटुंबाच्या प्रगतीला मोठा हातभार लावता आल्याचे आपणास मनस्वी समाधान आहे. सौ स्नेहलता कोल्हे
Post Views:
57