आत्मासाई डॉक्टर्स चषक’ टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा शनिवारपासून
Atmasai Doctors Cup’ Tennis Ball Cricket Tournament from Saturday
आत्मा मलिक मैदानावर दिवस-रात्र प्रकाश झोतात डॉक्टर्स क्रिकेट २०२४ चा महासंग्राम: राज्यातील २० संघ, आठ षटकांचे ३० सामने उपांत्य व अंतिम सामना १० षटकांचा Doctors Cricket 2024: 20 teams in the state, 30 matches of eight overs, semi-finals and finals of 10 overs.
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन!Thu 8 Feb 24, 15.30Pm.By राजेंद्र सालकर
कोपरगाव : डॉक्टरांच्या आरोग्याचे हित लक्षात घेऊन “आत्मासाई डॉक्टर्स क्रिकेट चषक २०२४” टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आत्मा मलिक मैदानावर शनिवारी १० व रविवारी ११ फेब्रुवारी दरम्यान दिवस-रात्र प्रकाश झोतात डॉक्टर्स क्रिकेट २०२४ चा महासंग्राम रंगणार आहे या स्पर्धेसाठी राज्यातील २० संघ, आठ षटकांचे ३० सामने तर उपांत्य व अंतिम सामना १० षटकांचा खेळला जाईल अशी माहिती विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी यांनी गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांना दिली.
प.पु.आत्मा मलिक गुरुमाऊली, इंडियन डेंटल असोसिएशन राज्य अध्यक्ष डॉ. विष्णुदास भंडारी व विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली आत्मा मालिक अकॅडमी, आत्मा मलिक हॉस्पिटल, इंडियन डेंटल असोसिएशन शिर्डी -कोपरगाव यांच्या वतीने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे
स्पर्धेविषयी अधिक माहिती देतांना नंदकुमार सूर्यवंशी म्हणाले, डॉक्टर सर्व समाजाच्या आरोग्याची काळजी घेतात ऋणसेवा करतात, परंतु स्वतःच्या आयुष्याकडे दुर्लक्ष करतात, म्हणून डॉक्टरांना त्यांच्या दवाखान्यातून काही काळ बाहेर येऊन क्रीडांगणावर खेळून त्यांचा शारीरिक व्यायाम होणे गरजेचे आहे. हे डॉक्टरांचे हित लक्षात घेऊन गेल्या तीन वर्षापासून डॉक्टरांच्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात येत आहेत. हा केवळ दंतरोग डॉक्टरांचाच नव्हे तर वैद्यकीय क्षेत्रातील सर्व डॉक्टर व संबंधितिचा क्रिकेटचा महासंग्राम आहे.
स्पर्धेच्या रूपरेषेविषयी सांगताना श्री सुर्यवंशी म्हणाले की, या स्पर्धेसाठी राज्यातून पालघर, बुलढाणा, बारामती, संभाजीनगर , नाशिक, अहमदनगर, आळेफाटा, जळगावसह एकूण वीस संघाने सहभाग नोंदवला आहे शनिवारी एकाच वेळी तीन मैदानावर प्रत्येकी आठ षटकांचे तब्बल ३० सामने दिवस रात्र प्रकाश झोतात खेळवले जाणार असून, रविवारी कॉटर फायनल सेमी फायनल आणि फायनल मॅच खेळली जाईल.. उपांत्य सामना व अंतिम सामना सेमी दहा षटकांची खेळण्यात येईल. हा डॉक्टर क्रिकेटचा महासंग्राम यशस्वी करण्यासाठी आत्मा साईची सर्व टीम डॉ. गणेश वाघ, डॉ. किरण खांदे, डॉ. गोविंद भोसले, डॉ. निलेश गायकवाड, डॉ. किशोर नागरे, डॉ. गौरव अग्रवाल, डॉ. वैभव पटेल डॉ. योगेश घंगाळे, डॉ. अंकित कृष्णानी, डॉ. मोहित बोरा, डॉ. कुणाल घायतडकर, डॉ. शैलेश भंडारी, डॉ. प्रसाद काळवाघे, डॉ. कांचन कावनपुरे हे प्रयत्न करीत आहेत. अशी माहिती नंदकुमार सूर्यवंशी यांनी पत्रकारांना दिली.
सदर डॉक्टर्स क्रिकेट महासंग्रामाचा आनंद घेण्यासाठी व सर्व खेळाडूंचे मनोधैर्य वाढविण्यासाठी आत्मा मलिक क्रिकेट मैदान येथे शनिवारी १० व रविवारी ११ फेब्रुवारी रोजी क्रिकेट प्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नितीन पाटील यांनी केले आहे. पत्रकार परिषदेचे नियोजन आत्मा मलिक हॉस्पिटलचे मॅनेजर सुनील पोकळे व हॉस्पिटलचे जनसंपर्क अधिकारी अक्षय कंर्डे यांनी केले होते. चेन्नई या कामी शिवाजी शिरसाट सर यांनी मदत केली.
Post Views:
270






