कोपरगावमध्ये संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा

कोपरगावमध्ये संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा

Interfaith community marriage ceremony on behalf of Sanjeevani Yuva Pratishthan in Kopargaon

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Wed7 Feb 24, 18.40Pm.By राजेंद्र सालकर

कोपरगाव : आर्थिकदृष्टया मागासलेले गोरगरीब शेतकरी सर्वसामान्य यांचा चा मोफत विवाह लावून देण्यासाठी सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केला असून सोहळ्यात विवाहासाठी नावे नोंदविण्याचे आवाहन संजीवनी युवा प्रतिष्ठान सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा समितीकडून करण्यात आले आहे. 

विवाहासाठी आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या जोडप्यांचा रीतिरिवाज तसेच धर्मशास्त्राप्रमाणे मोफत विवाह लावून दिले जाणार आहे.त्यासाठी संजीवनी युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी  सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याची संकल्पना मांडली होती.
२१ एप्रिल २०२४ रोजी तहसील कार्यालय शेजारी येथील “अलंकापुरी नगरी” मैदानावर हा  सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा पार पडणार असून या अनुषंगाने संजीवनी पतसंस्थेचे शेजारील गुरुद्वारा रोडवरील संजीवनी पतसंस्थेत शेजारील माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या संपर्क कार्यालयात नाव नोंदणी करण्यात येणार आहे नाव नोंदणीची अंतिम तारीख ११ एप्रिल २०२४ ही आहे . 
लग्नसोहळ्यासाठी होणाऱ्या खर्चामुळे वधूपित्याला आर्थिक विवंचनेचा सामना करावा लागतो. कर्जबाजारी व्हावे लागते. हे लक्षात घेऊन संजीवनी युवा प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले जाते. कुटुंब म्हणून विवाहाच्या खर्चाची सर्व जबाबदारी प्रतिष्ठान घेते. प्रतिष्ठानने स्वखर्चातून आजवर शेकडो विवाह घडवून आणले असून, ही सर्व दाम्पत्ये आज आनंदाने संसार करत आहेत. 
या सर्वधार्मिय सामुदायिक विवाह सोहळ्यात  शेतकरी,  गरीब गरजू,  इतर मागासवर्गीय यांची मुल, मुली व अनाथ मुलेमुली यांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांचा समाजकार्याचा वारसा पुढे चालवत असताना युवा नेते विवेक कोल्हे यांनी  संजीवनी युवा प्रतिष्ठानची स्थापना करून युवकांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. सामाजिक बांधिलकी जपत संजीवनी युवा प्रतिष्ठान गेल्या नऊ वर्षांपासून ‘जागवूया ज्योत माणुसकीची’ या ब्रीदवाक्यानुसार युवा सशक्तीकरण, सामाजिक एकता, कृषी, आरोग्य, पर्यावरण या क्षेत्रात नि:स्वार्थीपणे अविरत सेवाकार्य करत आहे. विविध सामाजिक उपक्रम व सेवाकार्याच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. 
नाव नोंदणीची अंतिम तारीख ११ एप्रिल २०२४ ही आहे. ही नोंदणी नि:शुल्क असून, नोंदणीसाठी आधार कार्ड झेरॉक्स, शाळा सोडल्याचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, रेशनकार्डची झेरॉक्स, दोन पासपोर्ट फोटो, पालकांचे संमतीपत्र आवश्यक आहे. सर्व जाती-धर्मातील विवाहेच्छुक तरुण-तरुणींनी या सामूहिक विवाह सोहळ्याचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी व नाव नोदंनीसाठी मो.८१८१९०९०९०, ९०११७७५०२५,८३२९२१४७१९,९३७०२२७३८५,९८९०५९०३२८ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन विवेक कोल्हे यांनी केले आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page