विखे पाटीलांमुळे भाजपचे खच्चीकरण! विवेक कोल्हे
Vikhe Patil’s destruction of BJP! Vivek Kolhe
शिर्डीत विवेक कोल्हे यांचा विखेंच्या विरुद्ध विराट जन आक्रोश मोर्चा Vivek Kolhe’s mass protest march against Vikhe in Shirdi
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Sat1 March 24, 18.10Pm.By राजेंद्र सालकर
कोपरगाव : राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पा. हे स्वत:च्या राजकीय स्वार्थापोटी प्रतिस्पर्ध्यांना संपवण्यासाठी मुस्कटदाबी व दडपशाहीचे राजकारण करून जिल्ह्यात भाजप कार्यकर्त्यांचे मोठय़ा प्रमाणावर खच्चीकरण करत असल्याचा खळबळजनक आरोप सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी केला आहे.
विवेक कोल्हे यांनी केलेल्या या आरोपामुळे पालकमंत्री विखे यांच्याकडून निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांची कशी गळचेपी सुरू आहे याचे धडधडीत वास्तवच समोर आले आहे. नामदार विखे यांच्या दडपशाही कारभाराविरोधात भाजप कार्यकर्त्यांमध्ये संतापाची प्रचंड खदखद असून कोल्हे यांनी केलेल्या थेट आरोपांमुळे या संतापाला आता तोंड फुटले आहे. शिर्डीतील विराट मोर्चातून ती खदखद बाहेर आली.
कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील ग्रामपंचायतींना विविध योजनांतर्गत मिळणाऱ्या शासकीय निधी वितरणात पालकमंत्री विखे यांच्याकडून जाणीवपूर्वक झालेल्या अन्यायाच्या निषेधार्थ व जनतेच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी युवा नेते विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी (१ मार्च) शिर्डी येथील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता.
विवेक कोल्हे यांनी यापूर्वीही ना. विखे यांच्याकडून भाजप कार्यकर्त्यांवर सुरू असलेल्या अन्याय, अत्याचाराविरोधात आवाज उठवला आहे. आज तर त्यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे जिल्हा नियोजन समितीअंतर्गत कोपरगाव विधानसभा मतदारसंघासाठी विकास कामे मंजूर करताना दुजाभाव करत असून, राजकीय द्वेषभावनेतून त्यांनी ग्रामपंचायतींना विविध योजनांतर्गत शासनाकडून मिळणारा निधी जाणीवपूर्वक अडवला आहे. त्यांनी हजारो दलित, आदिवासी समाजबांधवांसह गोरगरीब जनतेला शासकीय विकास निधीपासून वंचित ठेवले आहे. ते कोपरगाव व राहाता तालुक्यातील जनतेवर जाणीवपूर्वक अन्याय करीत असून, हा अन्याय थांबविण्यासाठी मी विखेंच्या विरोधात जनतेचे नेतृत्व करायला कधीही तयार आहे, असे थेट आव्हान दिले.
कार्यकर्त्यांमध्ये संतापाची प्रचंड खटखद आहे.विखेंच्या दडपशाही विरुद्ध मोर्चा
शुक्रवारी (दि १मार्च) रोजी शिर्डी येथील शासकीय विश्रामगृहापासून निघालेल्या या मोर्चात कोपरगाव मतदारसंघातील ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच, ग्रा. पं सदस्य, विविध कार्यकारी सहकारी संस्थांचे संचालक, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे व गणेश साखर कारखान्याचे संचालक, भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हातात काळे झेंडे घेऊन, भारतमाता की जय, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयघोष करत निघालेल्या मोर्चेकऱ्यांनी विवेकभैय्या कोल्हे तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, स्नेहलताताई कोल्हे आगे बढो, दलित, आदिवासींचा व ग्रामपंचायतींचा निधी अडवणाऱ्या पालकमंत्र्यांचा निषेध असो, नही चलेगी, नही चलेगी, दादागिरी नही चलेगी, पालकमंत्र्यांचे करायचे काय, खाली डोके वर पाय, निधी आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा, पालकमंत्र्यांचा दुजाभाव, सुरू आहे राजकीय डाव, हुकूमशाही बंद करा, कोण म्हणतो देणार नाही, आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही, शासकीय निधी वितरणात दुजाभाव नको, पाटपाण्याचा बट्ट्याबोळ, शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळ अशा विविध घोषणांनी संपूर्ण शिर्डी नगरी दणाणून सोडली होती. या मोर्चाच्या निमित्ताने विवेक कोल्हे यांनी जोरदार टोलेबाजी करत भाजप कार्यकर्त्यांचे खच्चीकरण करत असल्याचे सांगत त्यांनी खा. सुजय विखे, आ. आशुतोष काळे यांच्यावरही जोरदार टीका केली
ते संपूर्ण जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत; पण शासकीय निधी वाटपात ते दुजाभाव करत असून, ‘अडवा आणि जिरवा’ पद्धतीचे राजकारण करून आमच्यासारख्या पक्षातील निष्ठावान नेत्यांना हेतूत: त्रास देत आहेत. त्यांनी आ. आशुतोष काळे यांना हाताशी धरून कोपरगाव मतदारसंघातील कोल्हे गटाच्या ताब्यातील ग्रामपंचायतींना शासनाकडून मिळणारा विकास निधी जाणीवपूर्वक रोखून धरला आहे. गेल्या दीड-दोन वर्षापासून त्यांचा मनमानी कारभार सुरू आहे. गेल्या ३० ते ४० वर्षांपासून विखे यांच्या कुटुंबात आमदार, खासदार, मंत्री, जिल्हा परिषद अध्यक्ष अशी सत्तेची विविध पदे आहेत; पण सत्ताकाळात त्यांनी जनतेचे विकासाचे प्रश्न सोडविण्याऐवजी फक्त स्वत:ची राजकीय पोळी भाजून घेण्याचे काम केले.
पालकमंत्र्यांच्या मनमानी कारभाराने अनेक गावांतील पाणी, रस्ते, सिंचनासह विकासाचे अनेक प्रश्न रखडले आहेत. त्यांनी अनुसूचित जाती व नवबौद्ध घटक वस्ती विकास योजना, दलित वस्ती सुधार योजना, ठक्कर बाप्पा, गाय गोठा योजना, जनसुविधा योजना, वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजना, घरकुल योजना, जलजीवन मिशन, सिंचन विहीर योजना, अल्पसंख्याक निधी, शौचालय योजना, सामाजिक कल्याणकारी योजना अशा विविध योजनांचा निधी जाणीवपूर्वक दिला नाही. ३०-५४, ९०-१०, २५-१५, ५०-५४ यातून होणारी कामेही अडवली असून, आम्ही कोपरगाव तालुक्यातून दिलेले ५० पेक्षा अधिक शेळी-मेंढी पालन संस्थेचे प्रस्ताव त्यांनी दीड वर्षांपासून प्रलंबित ठेवले आहेत.
गणेश कारखाना, गोदावरी दूध संघ कुणी रसातळाला नेला, आपल्या मेहुण्याला निवडणुकीत उभे करून बिपीनदादा कोल्हे व स्नेहलताताई कोल्हे यांचा पराभवाला कुणी हातभार लावला हे सर्वांना ज्ञात आहे. मी लढवय्ये नेते स्व. शंकरराव कोल्हेंचा नातू आहे. जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी आज मी रस्त्यावर उतरलो आहे. आम्ही राजकीय स्वार्थासाठी आ. काळे यांच्यासारखे गुडघ्यावर बसून तुमचे पाय चेपणार नाही तर स्वाभिमानाने जनतेच्या प्रश्नांसाठी लढत राहू. कोपरगाव मतदारसंघातील जनता आ. आशुतोष काळेंच्या निष्क्रियतेला पुरती कंटाळली असून, अशा निष्क्रिय आमदारांची गॅरंटी तुम्ही घेता. तुम्ही आमची काळजी करू नका, आमची गॅरंटी कोपरगाव व राहाता तालुक्यातील जनता निश्चितच घेईल. तुमच्या जिरवाजिरवी, दडपशाही व हुकूमशाहीच्या राजकारणाला जशास तसे उत्तर देऊ, असा इशाराही त्यांनी विखे पिता-पुत्रांना दिला.
यावेळी किसनराव गव्हाळे, धनंजय जाधव, चंद्रकांत धनवटे, विक्रम पाचोरे, जितेंद्र रणशूर, शिवाजीराव लहारे, साहेबराव रोहोम, कैलास रहाणे, डॉ. मोरे, सरपंच संदीप देवकर, अनुराग येवले, कानिफ गुंजाळ आदींनी पालकमंत्री विखे पाटील व आ. आशुतोष काळे यांच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका केली. सूत्रसंचालन दीपक चौधरी यांनी केल.
चौकट – कोपरगाव आणि राहता तालुक्यात ज्या प्रकारे दुजाभावाची वागणूक नागरीकांना मिळत आहे त्यात जर बदल झाला नाही तर आगामी काळात मी राहात्यात तळ ठोकून बसेल असे सांगत विवेक कोल्हे यांनी विखेंच्या दडपशाहीविरुद्ध दंड थोपटले
Post Views:
58