शिक्षक मतदारसंघात विवेक कोल्हे यांचा उमेदवारी अर्ज दाखल.. ‘वृत्तवेध’ चा दावा खरा ठरला
Vivek Kolhe’s candidature filed in the teachers’ constituency The claim of ‘Vrittavedh’ was true
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन! Fir31 May , 19.10 Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव : सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते नाशिक शिक्षक मतदार संघाचा संघात संघाची निवडणूक लढविणार असल्याचा दावा ‘वृत्तवेध’ पोर्टलवर संपादक राजेंद्र सालकर दहा-बारा दिवसापूर्वी केला होता. आता वृत्तवेधचा दावा खरा ठरला आहे. विवेक कोल्हे यांनी शुक्रवारी (३१मे) रोजी नाशिक शिक्षक मतदार संघातून आपला पहिला उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे समोर आले आहे.
दहा-बारा दिवसापूर्वी १९ मे रोजी ‘वृत्तवेध’ पोर्टलवर संपादक सालकर यांनी या प्रकरणी मोठा दावा केला होता. विवेक कोल्हे यांचा निर्णय दूरगामी; मात्र कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता असल्याचे सांगत राजेंद्र सालकर यांनी मोठी खळबळ उडवून दिली होती. सालकरांनी केलेला दावा खरा असल्याचे अखेर समोर आले आहे. विवेक कोल्हे यांनी शुक्रवारी नाशिक शिक्षक मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले होते.
विधान परिषदेच्या शिक्षक-पदवीधर मतदार संघाची निवडणूक जाहीर झाल्यानंतर नासिक शिक्षक मतदार संघात उमेदवारी करण्याचा मोठा निर्णय आज युवा नेते विवेक कोल्हे यांनी घेतला आहे यंत्रणा कामाला लागलेली असून विवेक कोल्हे यांचा निर्णय दूरगामी ठरणारा आहे असे जाणकारांचे मत असल्याचे वृत्तवेधने ठामपणे जाहीर केले होते
या मतदारसंघाचे विवेचन करताना वृत्तवेधने म्हटले होते की नाशिक शिक्षकचे आ किशोर दराडे यांनी शिवसेनेला साथ दिली. पक्षातील फुटीनंतर दराडे बंधू हे ठाकरे गटाबरोबर कायम असले तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी त्यांचे चांगले संबंध आहेत. इकडे कोल्हे यांचे देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर चांगले संबंध आहेत. कोल्हे यांच्याकडे शैक्षणिक संस्था असून नाशिक जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांमध्ये त्यांचा चांगला संपर्क प्रभाव आहे संगमनेर तालुका आमदार बाळासाहेब थोरात याचेबरोबर तसेच रयत शिक्षण संस्थेतही कोल्हे यांचा चांगलं दबदबा आहे. विवेक कोल्हे नाशिक शिक्षक मतदार संघात निवडणूक लढत असतील तर आमदार आशुतोष काळे यांचा देखील त्यांना पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे या मतदार संघात सध्या तरी अपक्ष उमेदवार म्हणून युवा नेते विवेक कोल्हे निवडणूक लढणार आहेत त्याप्रमाणे त्यांनी काम करण्यास सुरुवातही केली आहे. विवेक कोल्हे यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता दिसून येत आहे परंतु विवेक कोल्हे यांचा निर्णय हा दूरगामी प्रभाव करणारा ठरणार आहे असे भाकीतच राजकीय जाणकारांचा हवाला देत ‘वृत्तवेधने जाहीर केले होते.