नासिक मतदारसंघातील शिक्षकांच्या प्रश्नासाठी शक्तीपणाला लावणार; विवेक कोल्हेंचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल
Shaktpanam will apply for the issue of teachers in Nashik Constituency; Vivek Kolhe’s independent candidature application filed
निवडणुकीत सुधीर तांबे यांची साथ आणि मार्गदर्शक निश्चितच मिळेल Sudhir Tambe will definitely get support and guidance in the election
Rajendara C. Salkar,News Portal, वृत्तवेध ऑनलाईन! Fir31 May , 19.00 Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव : नाशिक शिक्षक मतदार संघातील शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नासाठी शक्ती पणाला लावणार अशी ग्वाही देत माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचे नातू माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे सुपुत्र विवेक कोल्हे यांनी राजकीय पक्षीय जोडे बाजूला ठेवत नाशिक शिक्षक मतदारसंघातून शुक्रवारी (३१मे) अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
या वेळी प्रतिक्रिया देताना विवेक कोल्हे म्हणाले की शिक्षक हे देशाचा कणा आहेत.ते राष्ट्र जडणघडण करण्यात मोलाचे योगदान देतात.मात्र विविध प्रश्नांच्या विळख्यात पिढी घडवणारे गुरुजन अडकून पडले असताना त्यांना योग्य तो न्याय मिळावा यासाठी मला अनेकांनी मागणी केल्यानंतर विधानपरिषद लढवण्याचा मी निर्णय घेतला आहे.अनेक शिक्षक संघटना,पाच जिल्ह्यातील शिक्षक संस्थाचालक यांच्याशी संवाद साधल्यानंतर सकारात्मक प्रतिसाद मिळतो आहे.
प्रश्नांच्या गुंत्यात शिक्षकांना अडकून ठेऊ नये.शिक्षक पवित्र ज्ञानदानाचे काम करतात त्यांचे प्रश्न सुटण्यासाठी मला काम करण्याची ही संधी आहे असे मी मानतो.इतर देशांच्या तुलनेत भारताची क्षमता मोठी आहे मात्र शिक्षकांचे प्रश्न अनेक वर्ष सुटत नसतील तर त्यासाठी कुणीतरी पुढे होऊन सक्षम लढणे गरजेचे आहे.आमच्या कुटुंबाचं वसा हा सेवा हाच धर्म आहे त्यानुसार आम्ही तीन पिढ्या कार्यरत आहोत.शिक्षकांचा सन्मान टिकावा आणि त्यांचे प्रश्न सुटावे यासाठी माझे काम असणार आहे. माझी उमेदवारी ही शिक्षकांच्या आशीर्वादाने आहे त्यानुसार मी पूर्ण ताकतीने सकारात्मक कामाच्या रूपाने ही निवडणूक जिंकणार आहे असा विश्वास विवेक कोल्हे यांनी व्यक्त केला.