लढाई श्रेयवादाची ‘शहराला पाणी मिळण्याचं श्रेय कोणा एका व्यक्तीचं नाही’ – नितीन शिंदे
Battle of creditism ‘The credit of getting water to the city does not belong to any one person’ – Nitin Shinde
पाच नंबर साठवण तलावाचे जलपूजन करण्याचा इशारा
Rajendara C. Salkar,News Portal, वृत्तवेध ऑनलाईन!Fir13, Sep 8.10 Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव : नगरपालिकेच्या पाच नंबर साठवण तलावातील पाण्याच्या जलपूजनावरून आता श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे.पाच नंबर साठवण तलाव झाल्यामुळे शहराच्या पाणी प्रश्न सुटला त्यावरून कोपरगाव शहरवासीयांची मते येत्या विधानसभा निवडणुकीत आपल्याच पक्षाच्या पारड्यात पडावीत म्हणून चांगलीच रस्सीखेच सुरू झाली आहे.
कोपरगाव शहरात सुमारे ६० ते ७० हजार मतदान आहे ते आपल्याला मिळावं यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आ. आशुतोष काळे यांचे जलपूजनाच्या आडून प्रयत्न सुरू असताना यावर जोरदार हल्ला करताना काँग्रेसकडून शहराला पाणी मिळण्याचे श्रेय कोणा एका व्यक्तीचे नाही अशी टीका काँग्रेसचे प्रदेश सचिव नितीन शिंदे यांनी एका प्रसिद्धी पत्रकातून केली आहे.
नितीन शिंदे यांनी पत्रकात पुढे म्हटले आहे की कोपरगाव शहराला पाणीपुरवठा करणारे चार साठवण तलाव असताना पाणी कमी पडत होते. आठ दिवसाआड पाणी मिळत होते. त्यासाठी शहराला पाणी मिळावे म्हणून अनेकांनी लढा उभारला. त्यात राजेश मंटाला,संजय काळे व अनेक अज्ञात व्यक्ती समाजवेक आपल्या पद्धतीने लढत होते.मुळातच पाच नंबर तलावाचे श्रेय घेण्यासाठी आमदार काळे यांनी एकट्यानेच प्रयत्न करू नये, कारण गायत्री कन्स्ट्रक्शनचे टी. एस. आर. रेड्डी हे अखिल भारतीय काँग्रेसचे राज्य सभेतील खासदार आहेत त्यांना त्यावेळी शरद पवार व नितीन गडकरी यांनी या तळ्यातील खोदकामाची माती वाहून नेण्यासाठी व तळ्याच्या कामासाठी मदत करण्यास सांगितले होते म्हणून त्यांनी सर्व माती समृद्धी महामार्गाच्या भरावासाठी मोफत वाहून नेली. पालिकेचा मोठा बोजा कमी झाला व योजनेचे करोडो रुपये वाचले म्हणून हे शक्य झाले. याव्यतिरिक्त पाणी व पाच नंबर साठवण तलावासाठी सर्व समाजसेवक एकत्रित लढले तसेच तात्कालिन नगराध्यक्ष विजय वहाडणे व त्यांच्या सोबत तात्कालीन भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी सर्व नगरसेवकांनी एकमुखी ठराव केला. मदत केली म्हणून आज पाच नंबर साठवण तलाव पूर्णत्वाकडे जात आहे . असे पत्रकात म्हटले आहे.
कोपरगाव नगरपालिकेच्या तळ्यांसाठी जागा देण्याचे सर्वात मोठे योगदान माजी मंत्री स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांचे आहे त्यांनी दिलेल्या जागेनंतर एक गुंठा एक फूटभर देखील जागा नगरपालिका घेऊ शकली नाही त्याच उरलेल्या बावीस एकर सुपीक जागेत पाच नंबर आठवण तलाव झाला आहे. ती जमीनही स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांनीच त्यावेळी उपलब्ध करून दिलेली आहे. जेंव्हा जेंव्हा कोपरगाव शहराच्या पाण्याच्या इतिहासाची उजळणी होईल त्या त्या वेळेस स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांचे योगदान कोणालाही नाकारता येणार नाही. या पाच नंबर साठवण तलावासाठी आदित्य ठाकरे यांनी निवडणुकीच्या कोपरगाव येथील सभेत शब्द दिल्याप्रमाणे तात्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १३१ कोटीचा निधी दिला आहे. त्यांचेही मौलाचे योगदान नाकारता येणार नाही,. माती वाहून नेण्याचे मोलाचे काम ज्या गायत्री कंस्ट्रक्शन टी एस आर रेड्डी यांनी केले त्यांचेही योगदान विसरता येणार नाही, त्याचबरोबर पाच नंबर साठवण तलाव व्हावा यासाठी मंजुरी देणाऱ्या तात्कालीन भाजप शिवसेना राष्ट्रवादी नगरसेवकांचे योगदान व तात्कालीन नगराध्यक्ष विजय वहाडणे यांचे योगदान नाकारता येणार नाही, असे असताना कोणालाही विश्वासात न घेता जलपूजन करून कोणा एकानेच हे श्रेय घेणे हास्यास्पदच असल्याची टीका शिंदे यांनी केली आहे.
त्यामुळे येत्या काही दिवसात या पाच नंबर साठवण तलावात योगदान देणारे आम्ही सामाजिक कार्यकर्ते,या कामात मंत्रालय व अगदी पंतप्रधान कार्यालय इथवर पाठपुरावा करणारे राजेश मंटाला व मंगेश पाटील तात्कालीन नगराध्यक्ष तात्कालीन नगरसेवक व न्यायालयीन स्तरावर लढणारे संजय काळे व राजकीय कामात मदत करणारे आणि गायत्रीचे रेड्डी यांच्याशी मीटिंग करून आम्ही एकत्रित येत्या काही दिवसात शुभ मुहूर्तावर पाच नंबर तलावाचे जलपूजन करणार आहोत. यासाठी मोठी मदत झालेले गायत्री कन्स्ट्रक्शनचे खासदार श्री रेड्डी यांना देखील जलपूजन करण्यासाठी खास निमंत्रित करणार आहोत अशी माहिती खासदार श्री रेड्डी यांच्या थेट संपर्कात संपर्कात असणारे नितीन शिंदे यांनी दिली आहे.