माजी मंत्री शंकरराव कोल्हे हे विरोधकांनाही आदर आणि सन्मान देणारं नेतृत्व- सौ स्नेहलता  कोल्हे   

माजी मंत्री शंकरराव कोल्हे हे विरोधकांनाही आदर आणि सन्मान देणारं नेतृत्व- सौ स्नेहलता  कोल्हे

 Former Minister Shankarrao Kolhe is a leader who gives respect and honor to even the opposition – Mrs. Snehlata Kolhe

  २२ मार्च हा जागतिक जलदिन आहे. मात्र कोपरगावकरांसाठी २४ मार्च हाच जलदिन असावा 

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन!  , Tue24 March  18.10 Pm.By  सालकर राजेंद्र

 कोपरगाव: माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांनी राजकारण करताना लहान असो की मोठे विरोधकांना देखील आदर आणि सन्मान दिला तो  आदर्श घालून दिला आहे. त्या आदर्शानुसार कोल्हे परिवार मार्गाक्रमण करीत असल्याचे प्रतिपादन माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी एका कार्यक्रमात केले

 २४ मार्च रोजी माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या ९६ व्या जयंतीनिमित्त विघ्नेश्वर चौक अहिंसा स्तंभ या ठिकाणी भव्य असे कट आउट लावून व व्यासपीठ उभारून   जुने गावठाण कोपरगाव शहराच्या वतीने प्रेरणा दिवस  म्हणून साजरी करण्यात आली या कार्यक्रमात  त्या बोलत होत्या.                                     

        

स्नेहलता कोल्हे म्हणाल्या, शंकरराव कोल्हे साहेब  सहकार, शेती, पाणी, शैक्षणिक असा विधायक  विकासाची दृष्टी असलेले नेते होते त्यांनी सातत्याने पिण्याचे आणि शेतीच्या पाण्यासाठी मोठा संघर्ष केला कोपरगाव शहराच्या पाण्यासाठी त्यांची  दूरदृष्टी व मोठे योगदान आहे.

 यावेळी अष्टविनायक मंडळाच्या वतीने माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते गरजू शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.                         

       

 
यावेळी माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे, म्हणाले माजी मंत्री शंकरराव कोल्हे आणी आम्ही राजकीय विरोधक होतो अनेकदा त्यांचा आमचा संघर्ष झाला परंतु ते ज्या वेळेस भेटले  त्यावेळेस त्यांनी मला आदर आणि सन्मानच दिला काही प्रसंगी मला त्यांनी मार्गदर्शन देखील केले असा आठवणींना उजाळा दिला  
  माजी नगराध्यक्ष संजय सातभाई म्हणाले माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांनी सातत्याने कोपरगाव शहराच्या पिण्याचा व तालुक्याच्या शेतीच्या पाणी प्रश्नासाठी संघर्ष केला साठवण तलावासाठी जमीन खरेदी करून शहरासाठी तर पुढच्या पंचवीस वर्षाची तरतूद करून ठेवली होती. पुढच्या काळात  इंडिया बुल कंपनीने पळवलेले पाणी असो की  समन्यायी  पाणी वाटपामुळे मतदारसंघाचे पाणी कमी झाले त्यासाठी त्यांनी लढा दिला आजही कोपरगाव शहराच्या पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही त्यासाठी आपल्याला लढा द्यावाच लागणार आहे  योगायोगाने दरवर्षी २२ मार्च रोजी जागतिक जलदिन साजरा केला जातो, माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांच्यापासून प्रेरणा घेऊन कोपरगावच्या प्राणी प्रश्नासाठी यापुढे आपण २४  मार्च हा जलदिन म्हणून लढाई चालू ठेवावी असे सुचविले..  
संदीप वर्पे यांनी देखील आपल्या राजकीय जीवनात  माजी मंत्री शंकरराव कोल्हे साहेब यांचे किती मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य मिळाले या आठवणींना उजाळा दिला. 
संजय सातभाई, संदीप वर्पे योगेश बागुल दीपक  साळुंखे यांनी कोल्हे साहेबांच्या आठवणींना उजाळा दिला. प्रास्ताविक भाजपचे अध्यक्ष दत्ता काले यांनी केले
यावेळी  माजी नगराध्यक्ष दिलीप दारूणकर, राजेंद्र सोनवणे, कैलास जाधव, रवींद्र पाठक,  बाळासाहेब नरोडे, कैलास खैरे, हरिभाऊ गिरमे, योगेश बागुल,  बबलू वाणी, अशोक लकारे, अतुल काले, प्रमोद नरोडे, विजय आढाव, नारायण शेठ अग्रवाल, अविनाश पाठक, संदीप देवकर, बापू पवार, विष्णुपंत गायकवाड, राजेंद्र लोखंडे, प्रशांत कडू, विनोद राक्षे, हशमभाई पटेल, पप्पु पडियार, रंजन जाधव, नरेंद्र डंबीर, वैभव आढाव, शंकर बिराडे, खालील कुरेशी, राहुल देशपांडे, कलविंदरसिंग दडियाल, महेश खडामकर, शेखर कोलते, सतीश शेठ कृष्णानी, रवींद्र नरोडे, सतीश रानोडे, विजय शिंगाडे, आदिसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते

Leave a Reply

You cannot copy content of this page