मंजूर बंधाऱ्याची ४१ कोटीतून दुरुस्ती वेळेत व दर्जेदार करा -आ. आशुतोष काळें

मंजूर बंधाऱ्याची ४१ कोटीतून दुरुस्ती वेळेत व दर्जेदार करा -आ. आशुतोष काळें

Repair of manjur dam from Rs. 41 crore in time and quality. Ashutosh is black

पाटबंधारे अधिकाऱी व  ठेकेदाराला स्पष्ट सूचना

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन!Wed 7 May,, 18 .00 Pm.By  सालकर राजेंद्र

कोपरगाव:मंजूर येथील कोल्हापूर टाईप बंधारा एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल तीन वेळेस पुराच्या पाण्याने वाहून गेला ४१ कोटी रुपये निधी मंजूर बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी दिला आहे. केव्हा बंधाऱ्याचे काम वेळेत व दर्जेदार करा अशा स्पष्ट सूचना पाटबंधारे अधिकारी व संबंधित ठेकेदाराला आमदार आशुतोष काळे यांनी बुधवारी (७) रोजी शेतकऱ्यासह बंधाऱ्याच्या कामाच्या पाहणी केली त्यावेळी त्यांनी  उपस्थित अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या.

मंजूर येथील कोल्हापूर टाईप बंधारा एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल तीन वेळेस पुराच्या पाण्याने वाहून गेल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांचे भविष्य अंधकारमय झाले होते.त्यामुळे या बंधाऱ्याची तातडीने दुरुस्ती व्हावी अशी शेतकऱ्यांची मागणी होती त्या शेतकऱ्यांना बंधाऱ्याचे शाश्वत व टिकाऊ काम करण्यासाठी २०१९ च्या  निवडणुकीपूर्वी  निधी देणार असल्याचा शब्द दिला होता व पाठपुरावा करून त्यासाठी ४१ कोटीचा निधी राज्य सरकारकडून मिळवला आहे  असा मोठा निधी वारंवार मिळत नाही तेंव्हा  मंजूर बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम वेळेत व उच्च दर्जाचे करा अशा सूचना आ. आशुतोष काळे यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना व संबंधित ठेकेदाराला दिल्या आहेत.

ते म्हणाले की, कोपरगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील मंजूर,चास नळी, हंडेवाडी, धामोरी, मायगाव देवी, कारवाडी, वेळापूर, बक्तरपूर आदी गावातील शेती आणि शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण असलेला मंजूर बंधारा तीन वेळेस वाहून गेल्यामुळे मंजूर बंधाऱ्याच्या लाभधारक क्षेत्रातील शेतकरी हवालदिल झाले होते.  मंजूर बंधारा शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असून माझ्याप्रमाणे शेतकऱ्यांचे देखील सुरु असलेल्या कामावर बारीक लक्ष आहे. त्यासाठी सुरु असलेले काम वेळेत तर झालेच पाहिजे त्याचबरोबर हे काम उच्च दर्जाचे देखील होणे तेवढेच गरजेचे आहे.जेणेकरून कायमस्वरूपी या बंधाऱ्यात पाणी साठविले जाईल व कितीही मोठा पूर आला तरी मंजूर बंधारा अभेद्य राहील याची काम करतांना काळजी घ्या अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी यावेळी दिल्या.

यावेळी कार्यकारी अभियंता ग.प्र. हारदे, सहाय्यक अभियंता स.ना. देशमुख, कॉन्ट्रॅक्टर श्री. यादव आदींसह कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आजी-माजी पदाधिकारी व मंजूर,चास नळी, हंडेवाडी, धामोरी, मायगाव देवी, कारवाडी, वेळापूर, बक्तरपूर आदी गावातील शेतकरी उपस्थित होते.

चौकट :- मंजूर बंधाऱ्याच्या दुरुस्तीचा खर्च जरी मोठा असला तरी मंजूर बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे आव्हान स्वीकारले होते. दिलेला शब्द पूर्ण करायचाच या उद्देशातून मंजूर बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी किती आणि कसा पाठपुरावा केला हे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजितदादा पवार यांनी कोपरगाव येथील जाहीर सभेत सांगितले आहे. त्यांच्या सहकार्यातून मंजूर बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी महायुती शासनाकडून तब्बल ४१ कोटी रुपये मंजूर करून आणले आहेत.-आ. आशुतोष काळे.

            

Leave a Reply

You cannot copy content of this page