आमदार काळेंनी ५० लाख निधी दिल्याने जिजामाता उद्यानाचे रूपडे पालटणार- कृष्णा आढाव
MLA Kaleni to transform Jijamata park with Rs 50 lakh fund- Krishna Adhav
हा तर महिला आणि नागरिकांच्या मागणीचा सन्मान
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन Thu17July 18.00 Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव : शहरातील बच्चे कंपनीसह आबालवृद्धांच्या विरंगुळ्यासाठी असलेल्या जिजामाता उद्यानाला लवकरच नवा साज चढून हे उद्यानाचे रूपडे पालटणार आहे. आ. आशुतोष काळे यांच्या प्रयत्नाने उद्यानाच्या सुशोभिकरणासाठी नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परिक्षेत्रात अधिसूचित विशिष्ट नागरी सेवा व सुविधा पुरविणे योजना अंतर्गत ५० लाख रूपयांचा निधी मंजूर होऊन प्रशासकीय मान्यता नंतर निविदा प्रसिद्ध झाल्या असल्याची माहिती राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष कृष्णा आढाव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना आढाव यांनी सांगितले की, गोदावरी नदीच्या पवित्र तीरावर जिजामाता उद्यान असून शहरातील महिलांसाठी अत्यंत जिव्हाळ्याच्या असलेल्या जिजामाता उद्यानाच्या सुशोभिकरणाचे घोंगडे वर्षानुवर्षे भिजत पडले होते. उद्यानाच्या सुशोभिकरणाची मागणी नागरिकांकडून सातत्याने होत होती. दुरुस्तीअभावी उद्यानाची दैनावस्था झाली होती. दहा-बारा वर्षांपूर्वी उद्यानाच्या सुभोभिकरणावर लाखो रुपयांचा खर्च करूनही उद्यान भकास झाले होते. उद्यानात केवळ बसण्यासाठी असलेली आसने वगळता अन्य साहित्याचा थांगपत्ताच नव्हता.
जिजामाता उद्यानाला नवा साज देण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी पुढाकार घेतला आहे. नागरिक व महिलांसह राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी उद्यानाच्या सुशोभिकरणासाठी निधीची उपलब्धतता करून देण्यासाठी आमदार काळे यांच्याकडे आग्रह धरला होता. सातत्याने पाठपुरावा करून निधी मिळविण्यापासून त्या त्या कामांना प्रशासकीय मंजुरी व कामाच्या निविदा प्रसिद्ध होईपर्यंत आमदार आशुतोष काळे यांचा अथकपणे सुरूच असतो. त्याचाच एक भाग असणाऱ्या जिजामाता उद्यानाच्या विकासासाठी निधी मिळवून देवून आज प्रत्यक्षात विकास कामांच्या निविदा प्रसिद्ध झाल्या आहेत. असे आढाव यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे





