कोपरगाव क्रीडा संकुलाला मान्यता; ही कोपरगाव करांसाठी दसऱ्याची भेट – आ. आशुतोष काळे
Approval for Kopargaon Sports Complex; This is a Dussehra gift for Kopargaon residents – MLA Ashutosh Kale
दिलेल्या आणखी एका वचनाची पूर्ती
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन Wed 1 Oct 16.00 Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव : कोपरगावच्या क्रीडा संकुलाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेली मान्यता ही दसऱ्याच्या मुहूर्तावर खेळाडू व कोपरगावकरांसाठी दुहेरी आनंद असून आपण दिलेल्या आणखी एका वचनाची पुर्ती असल्याच्या भावना आ. आशुतोष काळे यांनी व्यक्त केल्या, हे संकुल कोपरगावच्या उदयोन्मुख खेळाडूंसाठी वरदान ठरेल व त्यांची अपूर्ण राहिलेली त्यांची स्वप्ने पूर्ण होतील याची मला खात्री आहे. असेही ते म्हणाले,
कोपरगावच्या मतदारांना निवडणुकीत दिलेल्या वचनांची सातत्याने पूर्ती करत असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतीच कोपरगावच्या क्रीडा संकुलाला मान्यता दिल्याने कोपरगावकरांना दिलेले आणखी एक वचन पूर्ण होणार अशा भावना आमदार आशुतोष काळे यांनी व्यक्त केल्या.
मंगळवारी (दि.३०) रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत आ. आशुतोष काळे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश लाभले असून कोपरगाव शहरात उपलब्ध असलेल्या जागेवर सर्व सुविधांनी परिपूर्ण असलेले भव्य क्रीडा संकुल उभारण्यास मान्यता दिल्याची गोड बातमी आ.आशुतोष काळे यांनी कोपरगावकरांना दिली.
कोपरगावातील तरुण खेळाडूंना विविध प्रकारच्या क्रीडा प्रकारांसाठी सराव करण्यास शहरात सुविधा उपलब्ध नसल्याने कोपरगाव शहरालगत क्रीडा संकुल होणे गरजेचे होते. अनेक वर्षापासून तरुणांची अशी मागणी देखील होती ही मागणी पूर्ण होत नसल्याने अनेक उदयोन्मुख खेळाडूंची होणारी कुचंबणा पाहून आमदार आशुतोष काळे यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी क्रीडा संकुल उभारण्याचे वचन खेळाडूंना दिले होते. तसा प्रस्ताव करून क्रीडा मंत्री अदिती तटकरे सह त्यांनी सातत्याने याचा पाठपुरावा सुरू ठेवला होता अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश आले आणि मंगळवारी व मुख्यमंत्री अजित पवार यांनी कोपरगाव शहरात नवीन क्रीडा संकुल उभारण्यास तातडीने तशा सूचना क्रीडा विभागाला दिल्या आहेत.
होऊ घातलेली क्रीडा संकुल उदयोन्मुख खेळाडूंच्या उज्वल भविष्यासाठी हे क्रीडा संकुल मैलाचा दगड ठरणार आहे. त्यामुळे तरुणाईमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून जिल्ह्यातील विविध क्रीडा संघटना, शाळा, महाविद्यालये आणि प्रशिक्षकांनी आ.आशुतोष काळे यांचे अभिनंदन केले आहे.
अभियंता यांच्या समवेत प्रस्तावित जागेची पाहणी करून आराखडा करण्यात येणार असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे. या बैठकीसाठी क्रीडा मंत्री ना.माणिकरावजी कोकाटे तसेच वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव ओ.पी.गुप्ता, राज्याच्या क्रीडा आयुक्त श्रीम.शीतल तेली-उगले, क्रीडा विभागाचे उपसचिव सुनील पांढरे, डॉ.राजेंद्र देशमुख आदी उपस्थित होते. दूरदृश्य प्रणालीद्वारे आ.आशुतोष काळे, जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव नागरगोजे, जिल्हा क्रीडाधिकारी खुरांगे सहभागी झाले होते.
Post Views:
63





