रविवारी केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा कोपरगावात – विवेक कोल्हे
Union Cooperation Minister Amit Shah in Kopargaon on Sunday – Vivek Kolhe
संजीवनी सीएनजी बायोगॅस प्रकल्प उद्घाटन व शेतकरी मेळावा Sanjeevani CNG Biogas Project inauguration and farmers’ meeting
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन Wed 1 Oct 14.00 Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव : कोपरगाव तालुका व पंचक्रोशीत पहिल्यांदाच देशाचे सहकार मंत्री आणि लोकप्रिय असे गृहमंत्री अमितभाई शहा हे सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना येथे रविवारी ५ ऑक्टोबर रोजी देशातील सहकार क्षेत्रातील पहिला सीएनजी बायोगॅस प्रकल्प व पोटॅश प्रकल्प या दोन्ही प्रकल्पांचे उद्घाटन व शेतकरी मेळाव्यासाठी कोपरगावात येणार आहेत. ही खऱ्या अर्थाने आपल्यासाठी एक आनंदाची गोष्ट अशा भावना सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष, युवा नेते विवेक कोल्हे यांनी बुधवारी कारखाना कार्यक्षेत्रावर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केल्या.

रविवारी ५ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता संजीवनी युनिव्हर्सिटीच्या कॅम्पस मध्ये सीएनजी बायो गॅस प्रकल्प व पोटॅश प्रकल्प या दोन्ही प्रकल्पाचे व्यासपीठावरून डिजिटल उद्घाटन अमितभाई शहा यांच्या हस्ते होणारा असून यावेळीच ते “शेतकरी मेळाव्या’तून शेतकऱ्यांना संबोधित करणार आहेत.
यावेळी सहकार मंत्री अमित भाई शहा यांच्याबरोबर महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्याचप्रमाणे केंद्रीय सहकार राज्यमंत्री आणि आपल्या महाराष्ट्राचे सुपुत्र मुरलीधर मोहोळ, विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे, राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, तसेच आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे व इत्यादी मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत अशी माहिती विवेक कोल्हे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी प्रकल्पाविषयी माहिती ते म्हणाले की, हा आगळावेगळा प्रकल्प भारतातील पहिला सहकारी तत्त्वावरतील सीबीजी किंवा कॉम्प्रेस नॅचरल बायोगॅस जो इंधन म्हणून आपण सर्व गाड्यांमध्ये त्या ठिकाणी भरतो. खत म्हणून वापरले जाणारे पोटॅश हे 100% भारताला आयात करावे लागते. ज्यावेळेस शेतकरी आपल्या पिकांसाठी पोटॅश खत म्हणून वापरतो ते उसामध्ये जातं आणि सर्व साखर मळी इथेनॉल काढल्यानंतर राहिलेल्या पेन्टवॉशमधून ते पोटॅश बाहेर काढण्याचा प्रकल्प आपण टाकलेला या दुसऱ्या प्रकल्पाचे देखील त्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. व परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी नागरिकांनी केंद्रीय सहकार मंत्री अमित भाई शहा या केंद्रीय नेतृत्वाचे विचार ऐकण्यासाठी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन विवेक कोल्हे यांनी यावेळी केले.
खऱ्या अर्थाने “अन्नदाता ते ऊर्जा दाता’ हा जो काय प्रवास या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली चालू झालेला आहे. त्या दिशेने कोल्हे कारखान्याने टाकलेले हे एक महत्त्वाचं पाऊल आहे. सीएनजी प्रकल्पातून संजीवनी उद्योग समूह दररोज १२ टन सीएनजी गॅस उपलब्ध करणार आहे. याच्या विक्रीसाठी त्रिपक्ष कंपन्या बरोबर करार देखील झाला आहे. यामुळे वाहतुकीसाठी लागणाऱ्या इंधनाच्या खर्चाची बचत होणार आहे. पोटॅश प्रकल्पामुळे देखील शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणाऱ्या खताचा मोठा फायदा होणार आहे. या दोन्ही प्रकल्पामुळे पर्यावरणाची देखील मोठी हानी टळणार आहे.
यापूर्वी स्व. शंकरराव कोल्हे यांच्या दूरदृष्टीतून संजीवनी कारखान्याने देशातील सर्वाधिक उपपदार्थ निर्मिती करणारा कारखाना म्हणून नावलौकिक मिळवलेला आहे. त्याच पावलांवर पाऊल टाकून बिपिन कोल्हे यांनी “जूट ज्यूस ते इथेनॉल’ निर्मिती केली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली
आज संजीवनी उद्योग समूहाने ५० कोटी रुपये खर्च करून सीएनजी बायोगॅस व पोटॅश या दोन्ही प्रकल्पांच्या माध्यमातून एक मोठे ऐतिहासिक पाऊल उचलले आहे.
केंद्रीय मंत्री सहकार मंत्री अमित भाई शहा यांनी वर्षानुवर्ष प्रलंबित असलेला साखर कारखान्याचा इन्कम टॅक्सचे पंधरा हजार कोटी रुपये माफ करून प्रश्न निकाली काढला. दोन टक्क्याहून सुरू झालेला हा प्रवास आज २०% पर्यंत गेलेला आहे. म्हणूनच सातत्याने अडचणीला तोंड देणाऱ्या साखर कारखानदारीसाठी एक प्रकारे “अन्नदात्याला ऊर्जादाता’ केल्याचं आपण बघतो आहोत असेही ते म्हणाले, शेतकऱ्यांना एफआरपी पेक्षा जास्त भाव देण्यासाठी कारखान्यांना अशा प्रकल्पांची आवश्यकता लागणार आहे. असे त्यांनी पत्रकारांना सांगितले.
Post Views:
52