राजकीय चढाओढीत कोपरगावच्या विकासाला गती ! 

राजकीय चढाओढीत कोपरगावच्या विकासाला गती ! 

Kopargaon Development Center in government shorts!

आजी-माजी आमदारांमध्ये विकासनिधी आणण्यासाठी धडपड

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन Fir 3 Oct 20.20 Pm.By  सालकर राजेंद्र 

कोपरगाव (राजेंद्र सालकर): गेल्या विधानसभा निवडणुकीपासून कोपरगाव तालुक्यात भाजप विरूद्ध राष्ट्रवादी हा सामना रंगत आहे. गेल्या अडीच वर्षात राज्यात महाआघाडीचे सरकार होते. कोपरगावमधील आमदारही याच पक्षाचा असल्याने भाजप बॅकफूटवर गेला होता. मात्र आता राज्यात भाजप सरकार सत्तेवर आले आहे. त्यामुळे माजी आमदार स्नेहलता कोल्हे या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्ती आहे. तर दुसरीकडे आमदार आशुतोष काळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्ती आहे त्यांनी कोपरगावमध्ये विकासकामांचा धडाका लावला आहे. तर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून स्नेहलता कोल्हे यादेखील सातत्याने पाठपुरावा करून तालुक्यासाठी भरघोस निधी आणत आहेत. राजकीय चढाओढीतून कोपरगाव विकास होत असल्याचे दिसून येत आहे.

त्यामुळे आ. आशुतोष काळे व माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्यात तीर्थस्थानाचा दर्जा असो, कोपरगावातील शासकीय इमारती असो, तालुक्यातील समाज मंदिरे असो,रस्त्यासाठी निधी असो, कोपरगाव बस आगारात नव्या  येणाऱ्या बस असो,  राष्ट्रीय महामार्ग 752 असो तालुक्यातील रस्ते असो कालव्यांना पाणी सोडणे असो, नुकताच  कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीला एक कोटी ७३ लाख ८० हजाराचा निधी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन योजनेंतर्गत मंजूर झाल्याचे आमदार आशुतोष काळे म्हणतात, तर पणनमंत्री जयकुमार रावल यांच्या माध्यमातून मंजूर केल्याचेही माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी सांगितले.

शेतकऱ्यांच्या मुक्कामाच्या अडचणी लक्षात घेता आपण तसा शेतकरी भावनांचा प्रस्ताव तयार करून तो शासनाकडे पाठविला त्याचा सातत्याने पाठपुरावा केला त्यामुळे निधी मंजूर झाला असून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पणन मंत्री जयकुमार रावल यांचे आभार मानले आहेत.

शासनाच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन अंतर्गत सभापती साहेबराव रोहोम व सर्व संचालकांनी प्रस्ताव देवुन त्यासाठी निधी मिळावा म्हणून मागणी केली होती. याकामी आपण पाठपुरावा केल्याचे त्या म्हणाल्या. त्यांनी देखील शासनाचे आभार मानले आहे

शह-प्रतिशह मध्ये नागरिक सुखावले !

राजकारणात शह-प्रतिशह देण्याचे काम नेहमीच सुरू असते. मात्र कोपरगाव तालुक्यात विकासकामांसाठी शासनाकडून निधी आणण्याची चढाओढ राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये सुरू असल्याचे दिसून येते. सोशल मीडियावर सुरू असलेल्या राजकीय द्वंद्वाची मजा कोपरगावमधील नागरिक घेत आहे. ऐकमेकांची विकासकामे न अडविता शासनाकडून जास्तीत जास्त कसा निधी आणता येईल याकडे या दोन्ही पक्षांनी पाहणे गरजेचे आहे. मात्र या राजकीय चढाओढीतही कोपरगावचा विकास होत असल्याचे पाहून येथील नागरिक सुखावले आहेत.

Leave a Reply

You cannot copy content of this page