कोपरगावमध्ये अवैध धंद्यांचा वाढता सुळसुळाट थांबवा – आमदार आशुतोष काळेंचे उपमुख्यमंत्र्यांना निवेदन
Stop the increasing proliferation of illegal businesses in Kopargaon – MLA Ashutosh Kale’s statement to the Deputy Chief Minister
जुगार–मटका ते वाळूचोरीपर्यंत सर्व अवैध कारभार बेफाम; पोलिस प्रशासन निष्क्रिय – कारवाई न झाल्यास उग्र आंदोलनाचा इशारा
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन Wed 3Dec 14.00Am.By सालकर राजेंद्र
कोपरगाव: मतदारसंघात गेल्या काही दिवसांपासून जुगार, मटका, अवैध दारूविक्री, तंबाखू–गुटखा विक्री, ऑनलाईन बेटिंग आणि वाळूचोरीसारखे अवैध धंदे उघडपणे सुरू असून नागरिकांचा त्रास दिवसेंदिवस वाढत आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत आ. आशुतोष काळे यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन देत तातडीने कारवाईची मागणी केली.
अवैध धंद्यांमुळे तरुण दिशाभूल, नागरिक भयभीत
कोपरगावात रात्री–दिवस सुरू असलेल्या या अवैध कारभारामुळे तरुण पिढी चुकीच्या मार्गाला लागत असल्याची चिंता आमदार काळे यांनी व्यक्त केली.स्थानिक नागरिकांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण तयार झाले असून, गुन्हेगारी वाढण्याची भितीही व्यक्त केली जात आहे.
पोलिस प्रशासनावर गंभीर आरोप – “निष्क्रियतेमुळे धंदे फोफावले”
निवेदनात आमदार काळे यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की,“अवैध धंद्यांवर पोलीस प्रशासनाची कोणतीही ठोस कारवाई होत नाही. जुगार अड्डे, मटका केंद्रे, अवैध दारूचे प्वाइंट, गुटखा वितरण, वाळूचे वाहतूक मार्ग सर्वांना माहित असताना पोलीस मात्र डोळेझाक करत आहेत. त्यामुळेच हे धंदे दिवसेंदिवस बिनधास्त वाढत आहेत.”
उपमुख्यमंत्र्यांकडे तातडीची मागणी
आमदार काळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विनंती केली की,कोपरगाव मतदारसंघात सुरू असलेल्या सर्व अवैध धंद्यांवर तातडीने बंदी आणून कडक कारवाईचे आदेश द्यावेत.
कारवाई न झाल्यास उग्र आंदोलनाचा इशारा
निवेदनाच्या शेवटी आमदार काळे यांनी स्पष्ट इशारा दिला,“जर त्वरित कारवाई केली नाही तर कोपरगावकरांना सोबत घेऊन मोठे उग्र आंदोलन उभारले जाईल.”
नागरिकांचे लक्ष उपमुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे
कोपरगाव करांनी सुरक्षित शांत आणि अवैध धंदा मुक्त कोपरगावची अपेक्षा व्यक्त केली असुन कोपरगावातील वाढत्या अवैध कारभारावर सरकार आणि पोलीस प्रशासन काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.
Post Views:
21