पोहेगाव–सोनेवाडी रस्ता रखडवून राजकीय खेळी; ठेकेदाराला काळ्या यादीत टाका – जावळे

पोहेगाव–सोनेवाडी रस्ता रखडवून राजकीय खेळी; ठेकेदाराला काळ्या यादीत टाका – जावळे

Political maneuvering behind the stalled Pohegaon-Sonewadi road project; blacklist the contractor – Jawale

२.२८ कोटींची वर्क ऑर्डर असूनही ठेकेदाराकडून काम शून्य; 

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईनThu15 Jan 19.30Pm.By  सालकर राजेंद्र

कोपरगाव :कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव–सोनेवाडी–सावळीविहीर हा महत्त्वाचा राज्य मार्ग ठेकेदाराच्या राजकीय स्वार्थामुळे रखडल्याचा गंभीर आरोप कर्मवीर शंकरराव काळे साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष काकासाहेब जावळे यांनी केला आहे. आ. आशुतोष काळे यांच्या पाठपुराव्यामुळे २ कोटी २८ लाख रुपयांचा निधी मंजूर होऊन ८ ऑक्टोबर २०२४ रोजी कार्यारंभ आदेश देण्यात आला. मात्र ठेकेदार नितीन औताडे यांनी आजतागायत प्रत्यक्ष काम सुरू केलेले नाही.

लोकप्रतिनिधी निधी आणतात, पण निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून ठेकेदार कामे रखडवतात, ही बाब दुर्दैवी असल्याचे जावळे म्हणाले. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी अशा ठेकेदारांना पाठीशी घालत आहेत का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी आ. आशुतोष काळे यांनी संबंधित अधिकारी व ठेकेदारांची बैठक घेऊन निकृष्ट व रखडलेली कामे करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. अन्यथा अधिवेशनात लक्षवेधी मांडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. त्यामुळे पोहेगाव–सोनेवाडी रस्त्याच्या ठेकेदाराला तात्काळ काळ्या यादीत टाकावे, अशी जोरदार मागणी होत आहे.

मुदत सुरू, काम नाही रस्त्याचे काम ८ ऑक्टोबर २०२५ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. मात्र मुदत सुरू होऊनही काम शून्य असल्याने ठेकेदार जाणीवपूर्वक अंग काढून घेत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page