केवळ भाषणबाजी नव्हे, कोल्हे चे समावेशकतेचे राजकारण कृतीतून- जितेंद्र रणशुर
Not just rhetoric, Kolhe’s politics of inclusivity is demonstrated through action – Jitendra Ranshur
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईनThu15 Jan 19.20Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव :कोपरगाव नगरपालिकेच्या ७८ वर्षांच्या इतिहासात सामाजिक समावेशकतेचा ठोस आणि स्पष्ट संदेश कोल्हे कुटुंबाच्या नेतृत्वाखाली दिला जात असून, हक्काचा नेता ही संकल्पना केवळ भाषणांपुरती न ठेवता प्रत्यक्ष निर्णयांमधून अंमलात आणली जात असल्याचे मत नवनियुक्त उपनगराध्यक्ष जितेंद्र चंद्रकांत रणशुर यांनी व्यक्त केले.
सामाजिक न्यायाच्या नावाखाली अनेकांकडून केवळ भाषणबाजी केली जाते; मात्र सत्ता मिळाल्यानंतर त्या शब्दांना निर्णयांची जोड देण्याचे धाडस फार थोडे दाखवतात, अशी स्पष्ट पण सभ्य टीका रणशुर यांनी केली. कोल्हे कुटुंबाने मात्र ‘सेवा हाच धर्म’ या तत्वावर सर्व समाजघटकांना सन्मानाने सोबत घेत प्रत्यक्ष कृतीतून आपली भूमिका सिद्ध केली असल्याचे ते म्हणाले.
सहकार क्षेत्राच्या इतिहासात प्रथमच मागासवर्गीय समाजातील रमेशराव घोडेराव यांना कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या व्हाइस चेअरमनपदी संधी देत सह्यांचे अधिकार बहाल करण्यात आले. सामाजिक समावेशकतेविषयी बोलणाऱ्यांसाठी हा निर्णय आदर्श ठरावा, असे रणशुर यांनी नमूद केले.
पालिका व सहकार क्षेत्रात कोणतेही आरक्षण नसतानाही दलित व वंचित घटकांतील कार्यकर्त्यांना नेतृत्वाची संधी देण्याची परंपरा कोल्हे कुटुंबाने सातत्याने जपली आहे. ७८ वर्षांच्या पालिका इतिहासात दलित समाजातील मोजक्याच व्यक्तींना उच्च पदांवर संधी मिळाली असून, त्या सर्व संधी कोल्हे नेतृत्वामुळेच शक्य झाल्या, हे वास्तव असल्याचे रणशुर म्हणाले.
युवा नेतृत्व विवेकभैय्या कोल्हे यांच्या अभ्यासू व दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली कोपरगावचा विकास हा आता केवळ आश्वासन न राहता कृतीत उतरलेला वास्तव ठरेल, असा विश्वास रणशुर यांनी व्यक्त केला.
Post Views:
8





