गौतम पॉलिटेक्निक सुनंदा इन्फोटेक सोबत सामंजस्य करार; विद्यार्थ्यांना औद्योगिक अनुभवाची संधी

गौतम पॉलिटेक्निक सुनंदा इन्फोटेक सोबत सामंजस्य करार; विद्यार्थ्यांना औद्योगिक अनुभवाची संधी

Gautam Polytechnic signs MoU with Sunanda Infotech; Opportunity for industrial experience for students

 इंडस्ट्री-स्टँडर्ड प्रशिक्षण, इंटर्नशिप आणि प्लेसमेंटसाठी प्राधान्य

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन,Feb Wad11.17.10 Pm.By  सालकर राजेंद्र 

कोपरगाव: कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटी संचलित गौतम पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटच्या कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभागाने नासिक येथील प्रसिद्ध सुनंदा इन्फोटेक प्रा.लि; कंपनीला औद्योगिक भेट दिली. यावेळी दोन्ही संस्थांमध्ये सामंजस्य करार झाला.

प्राचार्य वसीम शेख यांनी सांगितले की, या करारामुळे विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, प्रत्यक्ष प्रोजेक्ट व सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये अनुभव मिळणार आहे. तसेच इंडस्ट्रियल ट्रेनिंग, इंटर्नशिप आणि प्लेसमेंटसाठी कंपनीकडून प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे. विद्यार्थ्यांना नवीन टेक्नॉलॉजी, प्रोजेक्ट वर्क आणि इंडस्ट्री स्टँडर्ड वर्क कल्चरबाबत तज्ञांकडून मार्गदर्शन मिळणार आहे.

सुनंदा इन्फोटेकचे मॅनेजर सिद्धार्थ मांडवडे यांनी कंपनीच्या कार्यपद्धतीची माहिती दिली आणि भविष्यातील सहकार्याबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त केली.

चौकट:

विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमापुरते मर्यादित न ठेवता, इंडस्ट्रीशी थेट जोडणे ही काळाची गरज आहे. सचिव सौ.चैताली काळे यांच्या मार्गदर्शनाखाली अशा औद्योगिक भेटीचे आयोजन महाविद्यालय प्रशासन सातत्याने करत आहे. भविष्यातही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांना प्राधान्य देण्याचा प्रयत्न राहील.— प्राचार्य वसीम शेख

Leave a Reply

You cannot copy content of this page