शिर्डीत साई संस्थानला २५ लाखांची अत्याधुनिक स्कूल बस देणगी

शिर्डीत साई संस्थानला २५ लाखांची अत्याधुनिक स्कूल बस देणगी

Donation of a state-of-the-art school bus worth Rs 25 lakhs to Sai Sansthan in Shirdi

बेंगळुरूच्या साईभक्त सुमंत रेड्डी यांची भेट; शैक्षणिक संकुलातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासाला बळ

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन,Feb Wad11.17.20 Pm.By  सालकर राजेंद्र 

शिर्डी :श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट, शिर्डी संचलित शैक्षणिक संकुलासाठी बेंगळुरू येथील साईभक्त श्री. सुमंत रेड्डी यांनी SML ISUZU कंपनीची अत्याधुनिक स्कूल बस देणगी स्वरूपात अर्पण केली. सुमारे २५ लाख ३८ हजार ४०६ रुपये किंमतीची ही बस विद्यार्थ्यांच्या सुरक्षित व सुलभ प्रवासासाठी उपयोगी ठरणार आहे.

नूतन बसचे आज देणगीदारांच्या हस्ते विधीवत पूजन करण्यात आले. त्यानंतर बसची चावी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांच्याकडे औपचारिकरित्या सुपूर्द करण्यात आली.

या प्रसंगी संस्थानचे प्रशासकीय अधिकारी अतुल वाघ, मंदिर विभाग प्रमुख विष्णु थोरात यांच्यासह संस्थानचे इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. देणगीदार साईभक्त सुमंत रेड्डी यांचा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांनी सत्कार करून आभार मानले.

संस्थानच्या शैक्षणिक संकुलातील विद्यार्थ्यांना सुरक्षित, आरामदायी आणि सुसज्ज प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार असल्याने या देणगीबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले.

Leave a Reply

You cannot copy content of this page