धामोरीच्या उद्घाटनांना कोल्हे गटाच्या सदस्यांचा विरोध

धामोरीच्या उद्घाटनांना कोल्हे गटाच्या सदस्यांचा विरोध

Udghatanala virodha

वृत्तवेध ऑनलाईन। 7 Aug 2020,
By: Rajendra Salkar, 19:23

कोपरगाव :धामोरी ग्रामपंचायतीच्या विविध निधीतील मंजुर कामांचे उदघाटन विद्यमान आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते होणार आहे. सरपंचांनी आम्हांला विश्वासात न घेता कार्यक्रम ठेवलेला आहे. हे सदस्यांच्या हक्कावर गदा आणणारे असल्याने आम्हां कोल्हे गटांच्या दहा सदस्यांचा विरोध असल्याचे पत्रक अशोक दत्तात्रय भाकरे यांनी प्रसिद्धीस दिले आहे.

अशोक भाकरे म्हणाले, ग्रामपंचायतीच्या विविध योजनांमार्फत गावच्या विकासासाठी निधी येत असतो, त्या निधीअंतर्गत कामे होत असतांना विद्यमान आमदारांनी अद्याप एक रूपयाचाही निधी दिलेला नाही, त्यामुळे त्यांनी पहिल्यांदा स्वत:चा निधी ग्रामविकासासाठी दयावा आणि मगच उदघाटन करावे असे आवाहन त्यांनी पत्रकातून केले.

धामोरी ग्रामपंचायतीत सर्वाधिक १० कोल्हे गटाचे सदस्य आहेत. माजी आमदार सौ स्नेहलता कोल्हे यांनी या भागाचा विजेचा प्रश्न सोडवण्यासाठी ३३ के व्ही चे सबस्टेशन मंजुरी साठी प्रयत्न केलेले असून सदरचा प्रस्तावही पाठविलेला आहे. तसेच गावच्या विकासासाठी सुमारे १ कोटी रूपयाचा निधी दिलेला आहे, त्यामध्ये सामाजिक सभागृह, बसथांबा, हायमास्ट, मुस्लीम कब्रस्थानाचे सुशोभिकरण आणि वॉलकंपाऊंड तसेच धामोरी फाटा ते विटभटटी (धामोरी) रस्त्याच्या कामांचा समावेश आहे.मोठया प्रमाणात निधी देऊन भुमिपूजने,उदघाटने करण्याचा देखावा न करता विविध विकासकामे करण्यास प्राधान्य दिले. परंतु विद्यमान आमदारांनी अद्यापपर्यंत गावाला कोणत्याही प्रकारचा निधी दिला नाही, ते ग्रामपंचायतीच्या निधीतील कामांचे लोकार्पण व भूमीपूजन करत आहे. असेही श्री भाकरे यांनी पत्रकात नमूद केले आहे .

Leave a Reply

You cannot copy content of this page