“महावीरांचा अहिंसेचा संदेश आजही तितकाच धारदार!” – आ.आशुतोष काळे

महावीरांचा अहिंसेचा संदेश आजही तितकाच धारदार!” – आ.आशुतोष काळे

“Mahavira’s message of non-violence is just as potent today!” – MLA Ashutosh Kale

रथयात्रेत उसळला जनसागर; ‘जगा आणि जगू द्या’चा विचारच मानवतेचा खरा आधार

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन,March 30Mon.19.00 Pm.By  सालकर राजेंद्र 

कोपरगाव : सत्य, अहिंसा आणि क्षमामार्गाचा ध्यास देणाऱ्या भगवान महावीरांची जयंती कोपरगाव शहरात यंदा उत्साहाच्या शिखरावर साजरी झाली. जैन समाजाच्या वतीने काढण्यात आलेल्या भव्य रथयात्रेने शहराच्या रस्त्यांवर श्रद्धेचा आणि एकतेचा जल्लोष उभा केला. या उत्सवात सहभागी होत आ.आशुतोष काळे यांनी महावीरांच्या विचारांची आजच्या काळातील गरज अधोरेखित केली.

रथयात्रेत सहभागी झाल्यानंतर बोलताना आशुतोष काळे यांनी ठाम शब्दांत सांगितले की, “महावीरांचा ‘जगा आणि जगू द्या’ हा संदेश केवळ उपदेश नाही, तर आजच्या तणावग्रस्त समाजासाठी जीवनमार्ग आहे.

” ते पुढे म्हणाले, शस्त्रांच्या जोरावर जिंकलेली सत्ता क्षणभंगुर असते, पण प्रेम, संयम आणि अहिंसेने जिंकलेली मने कायम टिकतात.

काळे यांनी क्षमामार्गाचे महत्त्व अधोरेखित करताना स्पष्ट केले की, क्षमा ही कमजोरी नसून ती खऱ्या ताकदीची ओळख आहे. आजच्या स्पर्धात्मक आणि अस्थिर वातावरणात शांतता आणि सहअस्तित्व टिकवायचे असेल, तर महावीरांचे विचार अंगीकारणे अत्यावश्यक आहे.

दरम्यान, जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या रथयात्रेत मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. जयघोष, भजन-कीर्तन आणि धार्मिक कार्यक्रमांनी संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते. ठिकठिकाणी नागरिकांनी फुलांची उधळण करत यात्रेचे स्वागत केले, तर समाजातील विविध घटकांनी एकत्र येत एकात्मतेचा संदेश दिला.

या कार्यक्रमाला जैन समाजाचे पदाधिकारी, ट्रस्टी, विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उत्साह, श्रद्धा आणि सामाजिक सलोखा यांचा मिलाफ या सोहळ्यात ठळकपणे दिसून आला.

महावीर जयंतीच्या निमित्ताने कोपरगावात उमटलेला अहिंसा, प्रेम आणि सहिष्णुतेचा हा संदेश केवळ औपचारिकतेपुरता मर्यादित न राहता समाजाच्या प्रत्येक स्तरात पोहोचणे गरजेचे आहे. अन्यथा उत्सव मोठा होईल, पण विचार हरवतील.हीच खरी चिंता आणि तेवढीच जबाबदारीही समाजासमोर उभी आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page