जन्म ते अंत्य… संस्कारांचा अखंड दीप! जंगम (स्वामी) परिवार :

 जन्म ते अंत्य… संस्कारांचा अखंड दीप! जंगम (स्वामी) परिवार :

From Birth to the Final Rites… The Unceasing Lamp of Sacred Traditions! The Jangam (Swami) Family:

कोपरगावच्या श्रद्धा, संस्कार आणि गुरुत्वाची जिवंत परंपरा

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन,March 30Mon.19.20 Pm.By  सालकर राजेंद्र 

कोपरगाव  कोपरगावच्या गजबजलेल्या बिरोबा चौकात एक छोटंसं दुकान…ना भव्यता, ना झगमगाट… पण तरीही त्या जागेत सामावलंय संपूर्ण जीवनचक्र! जन्मापासून ते अंत्यापर्यंत प्रत्येक टप्प्यावर साथ देणारी,विश्वास, संस्कार आणि गुरुत्वाची परंपरा जपणारी ही कथा आहे जंगम (स्वामी) परिवाराची!
विश्वासाचा दिवा… जो पिढ्यानपिढ्या तेवत राहिला!
कधीकाळी घोड्यावरून गावोगावी फिरत, लोकांपर्यंत पोहोचणारे दशरथ जंगम बाबा स्वामी आणि बाबुराव दशरथ जंगम (स्वामी)
यांनी पेटवलेला विश्वासाचा दिवा आजही तेवतो आहे.तोही पूर्वीइतक्याच तेजाने!त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत बाळासाहेब जंगम, छबुराव जंगम स्वामी आणि आजची पिढी, बाबासाहेब, प्रशांत, राहुल, शाम, जितेंद्रपरंपरेचा वारसा जपत आधुनिकतेची कास धरत उभी आहे.
 परंपरेला उद्योगाचा नवा आयाम!
नवरदेवाच्या कपाळावर शोभणाऱ्या मंडवळ्या, बाशिंग,यांचा होलसेल व्यवसाय सुरू करून
या परिवाराने परंपरेला दिला आहे व्यवसायिक विस्तार! पण हा केवळ व्यापार नाही… तर संस्कारांचा प्रसार आहे!
केवळ विक्रेते नाही… संस्कारांचे ‘गुरु’!
लिंगायत वाणी, गवळी, बुरुड समाजांच्या विवाहविधींमध्ये जंगम स्वामींची भूमिका ही फक्त साहित्य पुरवणाऱ्यांची नाही…ते असतात गुरु! मंगलाष्टकांच्या स्वरांतून,कन्यादानाच्या पवित्र क्षणी,त्यांचा मंत्रोच्चार हा केवळ विधी नसतो.तो असतो परंपरेचा श्वास आणि श्रद्धेचा स्पंदन!
जन्मापासून शेवटच्या प्रवासापर्यंत… एकच आधार!
नवजात बाळाच्या पहिल्या पूजेपासून, विवाहाच्या मंगल गजरापर्यंत,आणि अंत्यसंस्काराच्या शांत क्षणापर्यंत…प्रत्येक टप्प्यावर जंगम (स्वामी) परिवार म्हणजे
विश्वासाचा आधारस्तंभ!
श्रद्धेचं केंद्र… जिथे विश्वासही नतमस्तक!
महिलांच्या विश्वासाचं हे केंद्र…
मंगळसूत्र, काळे मणी, डोरले, मनचली, डोरल्याच्या पाळ्या,सोन्याचे दागिने,सगळं काही इतक्या प्रामाणिकपणे हाताळलं जातं,की इथे विश्वासही नतमस्तक होतो!
हळद, कुंकू, बुक्का, शेंदूर, उदबत्ती…ही फक्त वस्तू नाहीत.त्या आहेत श्रद्धेच्या रंगांनी रंगलेलं भावविश्व!

साधेपणातच मोठेपण!
साधा पेहराव…कपाळावर शिवभस्म…आणि वागण्यातली नम्रता…यातूनच उमटते जंगम समाजाची खरी ओळख सेवा, श्रद्धा, संस्कार आणि गुरुत्व!
कार्यकर्तृत्वाचा ठसा…
कोपरगावच्या चौकात उभं राहून जेव्हा या दुकानाकडे नजर जाते,तेव्हा एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते.ही माणसं केवळ व्यवसाय करत नाहीत.तर प्रत्येकाच्या आयुष्यातील शुभारंभाची पहिली घंटा वाजवतात!आणि त्या क्षणाला देतात पवित्रतेची दिशा!
अंतिम शब्द…
काही व्यवसाय हे केवळ उपजीविकेचे साधन नसतात…ते असतात जीवनाशी जोडलेले अदृश्य धागे!आणि जंगम (स्वामी) परिवाराची ही परंपरा म्हणजे त्या धाग्यांचीच एक सुंदर, पवित्र,गुरुत्वाने उजळलेली विण!

शब्दांकन – सुरेश गोरे सर (९८५० ६१३ ६१२)

Leave a Reply

You cannot copy content of this page