कोपरगाव बाजार समितीत , कांदा १९ तर डाळींब १०० रूपये किलो,

कोपरगाव बाजार समितीत , कांदा १९ तर डाळींब १०० रूपये किलो,

वृत्तवेध ऑनलाईन। 19 Aug 2020,
By: Rajendra Salkar, 17 :15

कोपरगाव : कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे , कांदा डाळींब मार्केट बुधवार पासून सुरु करण्यात आले आहे.आज मार्केटमध्ये २०५५ क्विंटल कांदा आवक झाली आहे. १११६ कॅरेट डाळिंब आवक झाली आहे अशी माहिती सभापती संभाजी पाटील रक्ताटे यांनी दिली.

यंदा कांद्याचे उच्चांकी उत्पादन झाले. त्यात कोरोनाचा दणका यामुळे कांद्याला मोठा फटका बसला आहे. बुधवारी (१९ ऑगस्ट) रोजी कोपरगाव बाजार समितीमध्ये २०५५ क्विंटल कांदा आवक झाली कांदा नंबर एक १८०० ते १९२५ रुपये, कांदा नंबर २ – १५०० ते १७५० रुपये,गोल्टी ६०० ते ११५० रुपये, जोड कांदा ३०० ते ५५० रुपये भाव मिळाला असल्याची माहिती उपसभापती राजेंद्र पाटील निकोले यांनी दिली.

मंगळवारी कोपरगाव बाजार समिती मार्केट मध्ये प्रत्येकी २० किलो अशा ११६ कॅरेट डाळिंब आवक झाली आहे
डाळिंब नंबर १- १३५० ते २००० रुपये, डाळिंब नंबर २ – १००० ते १३०० रुपये, डाळिंब नंबर ३ -५०० ते ९५० रुपये भाव मिळाला आहे अशी माहिती सभापती संभाजी पाटील रक्ताटे यांनी दिली आहे.
डाळिंब लिलाव- सोमवार ते शनिवार, कांदा लिलाव – मंगळवार ते शनिवार , भुसार माल लिलाव सोमवार, बुधवार व शुक्रवार या वारी राहील अशी माहिती सचिव नानासाहेब रणशुर यांनी दिली.
आता मार्केटमध्ये गर्दी होऊ नये म्हणून ठराविक गाड्या आता सोडण्यात येत आहेत.

 

Leave a Reply

You cannot copy content of this page