ऑनलाइन : मनाली कोल्हे यांची शाडूची गणेश मुर्ती बनविण्याची कार्यशाळा

ऑनलाइन : मनाली कोल्हे यांची शाडूची गणेश मुर्ती बनविण्याची कार्यशाळा

वृत्तवेध ऑनलाईन। 20 Aug 2020, By: Rajendra Salkar, 16 :15

संजीवनी अकॅडमीच्या पर्यावरण पुरक गणेश मुर्त्या,

सौ. प्रियंका रासकर यांच्या ऑनलाईन मार्गदर्शनाखाली विध्यार्थ्यानी बनविलेल्या शाडूच्या गणेश मुर्ती.

कोपरगांव : संजीवनी नेहमीच नाविण्यासाठी ओळखली जाते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संजीवनी अकॅडमी व संजीवनी इंटरनॅशनल स्कूलच्या विध्यार्थ्यानी प्रदुषण मुक्त पर्यावरणासाठी इकोफ्रेंडली गणेश स्थापनेची शपथ घेतली आहे. या उपक्रमाअंतर्गत संजीवनीच्या विध्यार्थ्यांसाठी स्कूलच्या संचालिका सौ. मनाली अमित कोल्हे यांच्या संकल्पनेतुन शाडूच्या मातीच्या गणेश मुर्ती बनविण्याची कार्यशाळा आयोजीत करण्यात आली होती.
या कार्यशाळेत सौ. प्रियंका रासकर यांनी विध्यार्थ्यांना शाडूच्या मातीपासुन गणेश मुर्ती बनविणे व ती आभुषनांनी सुशोभित करणे, इत्याइी बाबींबाबत मार्गदर्शन केले. या उपफ्रमाबाबत प्रतिक्रीया देताना सौ. कोल्हे यांनी सांगीतले की, आजचे विध्यार्थी उद्याच्या भारताचे भवितव्य आहे. त्यांना बालपनापासुनच एक जबाबदार नागरीक बनविणे व त्यांना सुशिक्षित बनविण्याबरोबरच सुसंस्कृत बनविणे हे स्कूलचे कर्तव्य आहे. त्यांच्यात पर्यावरणा विषयी जागृती निर्माण करणे हेही महत्वाचे आहे. म्हणुनच गणेश उत्सवाच्या पर्वावर शाडूच्या मातीपासुन गणेश मुर्ती बनविणे हा उपक्रम हाती घेण्यात आला. शाडूची मुर्ती पाण्यात लवकर विरघळते व हे पाणी व माती आपण आपल्या बागेत झाडांना घालुन त्याचे पावित्र्य टिकवु शकतो. त्याच बरोबर पाण्याचे प्रदुषण आणि विसर्जनानंतर मुर्तीची विटंबना रोखु शकतो.
या ऑनलाईन कार्यशाळेत संजीवनी इंटरनॅशनल स्कूलच्या प्राथमिक वर्गाच्या विद्यार्थ्यांनी व संजीवनी अकॅडमीच्या पुर्व प्राथमिक ते इ. १० वी पर्यंतच्या विध्यार्थ्यानी उत्स्फुर्त प्रतिसाद नोंदविला. विध्यार्थ्यानी बनविलेल्या गणेश मुर्तींची स्थापना ते आपापल्या घरी गणेश चतुर्थीच्या दिवशी करणार आहे व पुजेचा आनंद घेत भारतीय संस्कृतीचे जतन करणार आहे. सर्वांनीच इकोफ्रेंडली गणेश मुर्तींची स्थापना करून पर्यावरणाचा ऱ्हास थांबवावा असे आवाहन सौ. कोल्हे यांनी करून सर्वांनाच गणेश उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहे.
संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे कार्याध्यक्ष नितीनदादा कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी  अमित कोल्हे यांनी या उपक्रमाचे स्वागत केले.

Leave a Reply

You cannot copy content of this page