सावधान : कोरोना पाय पसरतो आहे ; कोविड सेंटरला सोयीसुविधा व औषधे पूरवा- स्नेहलता कोल्हे
वृत्तवेध ऑनलाइन , 25 Aug, 2020
By: Rajendra Salkar 19:30
कोपरगाव : जिल्हयात कोरोना पाय पसरतो आहे तेंव्हा जिल्ह्यातील सर्व कोविड सेंटरला सोयीसुविधा व औषधे पूरवा जोरदार मागणी भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव, माजी आमदार सौ स्नेहलता कोल्हे यांनी राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री ना. राजेश टोपे यांचेकडे केली आहे.
सध्या जगभरासह देश आणि राज्यात कोरोना विषाणूचा मोठया प्रमाणात प्रादुभाव सुरू आहे. अहमदनगर जिल्हयातही दिवसेंदिवस मोठया प्रमाणात रूग्ण वाढत आहे. त्यामुळे वैदयकिय कर्मचारी आणि डाॅक्टरांवर ताण पडत आहे. अशा परिस्थितीत एखादया रूग्णाची प्रकृती बिघडली तर त्यांना आॕक्सीजन, व्हेंटीलेटर लावण्याची गरज पडते, अशा वेळी वैद्यकीय साधने उपलब्ध नसल्याने जिल्हयाच्या ठिकाणी जाण्याचे अंतर दूर असल्याने वेळ जातो त्याचप्रमाणे रूग्णाच्या उपचारादरम्यान वापरले जाणारे विविध औषधेही उपलब्ध नसल्याने रूग्णांना तसेच नातेवाईंकांना ही औपधे मिळविण्यासाठी पायपीट करावी लागते, त्यामुळे जिल्हयातील कोवीड सेंटरमध्ये आवश्यक औषधे उपलब्ध करून दयावीत अशी मागणी सौ. कोल्हे यांनी केली आहे.