गंगागीर कॉलेजला बी.सी.एस. व एम.एस्सी.गणित या अभ्यासक्रमास शासन व विद्यापीठाची मान्यता – प्राचार्य डॉ.थोपटे
वृत्तवेध ऑनलाइन। 7 Sep 2020
By: Rajendra Salkar, 16.00
कोपरगाव : येथील रयत शिक्षण संस्थेचे, एस.एस.जी.एम कॉलेज, कोपरगाव हे एक विद्यार्थ्यांच्या कला गुणांना योग्य तऱ्हेने फुलवणारे एक आदर्श महाविद्यालय आहे. वास्तवाची जान आणि आदर्शाची ओढ असणाऱ्या या महाविद्यालयात चालू शैक्षणिक वर्षात बी.सी.एस. (बॅचलर ऑफ कॉम्पुटर सायन्स) व एम.एस्सी.गणित हे दोन नवीन कोर्स आणि एम.एस्सी रसायनशास्त्र (ऑर्गनिक अॅनालीटीक्स) या विषयाच्या दोन वाढीव तुकड्यांना मान्यता प्राप्त झालेली आहे.
सदर महाविद्यालयात तज्ज्ञ प्राध्यापक, भव्य क्रीडांगण, सुसज्ज प्रयोगशाळा, समृद्ध ग्रंथालय आणि रमणीय परिसर असल्याने कोपरगाव परिसरातील विद्यार्थ्यांना हे महाविद्यालय नेहमीच आकर्षित करीत आहे. सदर कोर्सची मान्यता महाराष्ट्र शासन व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांच्याकडून प्राप्त झालेली आहे. हे उपलब्ध कोर्स विद्यार्थ्यांना निश्चितच रोजगाराच्या दृष्टीने उपयुक्त ठरतील. असे मत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.आर.थोपटे यांनी व्यक्त केले. हे कोर्स सुरु करण्यासाठी महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन व सदस्य, प्राचार्य यांनी प्रयत्न केले. सदर कोर्सची प्रवेश प्रक्रिया सुरु झालेली आहे. यासाठी महाविद्यालयाच्या वेबसाईटला भेट द्यावी. असे आवाहन प्राचार्य यांनी केले.
Post Views:
557