कोपरगावात रात्री साडे नऊपर्यंत दुकानांना परवानगी द्या’
TagsarticalAllow shops until 9:30 p.m.
वृत्तवेध ऑनलाईन | 16 Oct 2020,
By: Rajendara Salkar 14.00
संपादक राजेंद्र सालकर
कोपरगाव : नवरात्रौ, दिवाळीच्या सणात रात्री साडे नऊ वाजेपर्यंत दुकाने उघडी ठेवण्यास कोपरगाव शहर व तालुक्यातील व्यापाऱ्यांना परवानगी मिळावी, अशी मागणी सातत्याने होत आहे. यावर स्थानिक प्रशासनाने गांभीर्याने विचार करून निर्णय घेण्याची योग्य वेळ आली आहे.
तेंव्हा कायद्याचा फारसा किस न काढता व्यावसायासाठी शिथिलता देतांना अटी व शर्ती यांचे काटेकोर पालन झाले पाहिजे याची काळजी प्रशासनाने घेतली पाहिजे. जनता यास निश्चितच सहकार्य करेल यात शंका नाही.
उद्या शनिवारी १७ ऑक्टोबरपासून सणासुदीचे दिवस सुरू होत असल्याने निर्णय घेण्याची ही योग्य वेळ आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, मिशन बिगीन अगेननुसार, आता मुंबईत बार, हॉटेल, रेस्टॉरंट, फुड कोर्ट सकाळी ७ ते रात्री साडेअकरा वाजेपर्यंत सुरू ठेवायला तर दुकाने आणि व्यापारी आस्थापनांना सकाळी ७ ते रात्री साडेनऊपर्यंत सुरू ठेवायला मुंबई महानगरपालिकेने परवानगी दिली आहे. मग आम्हालाच परवानगी का नाही ? असा सवाल
कोपरगावकर स्थानिक प्रशासनाला करीत आहे. याबाबतचे परिपत्रक स्थानिक प्रशासनाने जारी अशी मागणी जोर धरू लागली आहे .
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, लागू करण्यात आलेला लॉकडाऊन आता मिशन बिगीन अगेननुसार, हळूहळू शिथील करण्यात येत आहे. या आधी मुंबईतील हॉटेल्स, बार, रेस्टॉरंट, फुड कोर्टला तसेच दुकानांना सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत सुरू ठेवायला परवानगी देण्यात आली होती. त्याचबरोबर हॉटेल्समध्ये क्षमतेच्या ५० टक्के ग्राहक घेण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र, आता हॉटेल, बार, रेस्टॉरंट आणि फुड कोर्टला अडीच तास वाढवून देण्यात आला असून दुकानांनाही अर्धा तास वाढवून देण्यात आला आहे. त्याच धर्तीवर कोपरगावातही हॉटेल, बार, रेस्टॉरंट यांना सकाळी ७ ते रात्री दहा पर्यंत देण्यात आला आहे, तो दिड तास वाढवून रात्री साडे अकरा पर्यंत करावा, तसेच दुकानांना सकाळी ७ ते रात्री ७ वाजेपर्यंत सुरू ठेवायला परवानगी देण्यात आली होती. ती अडीच तास वाढवून साडे नऊ पर्यंत करावी,कारण अधिक मास, नवरात्र आणि त्यानंतर दिवाळी या सणांच्या काळात मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. सध्या सात वाजेपर्यंतच दुकाने सुरू असल्याने नोकरदार ग्राहकांची गैरसोय होत आहे. या पार्श्वभूमीवर दुकानांची वेळ वाढवून साडे नऊ पर्यंत करण्याची मागणी सातत्याने विविध संघटना मार्फत केली जात आहे. हा विषय गंभीर आणि व्यापारी नागरिकांच्या जिव्हाळ्याचा आहे. त्यामुळे शासनाने विनाविलंब यासंदर्भात उचित निर्देश संबंधित विभागास द्यावेत. तसेच स्थानिक स्तरावर त्या सूचना लवकरात लवकर पोहोचतील असेही पाहावे.





