व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार बुधवारी उपनगराध्यक्ष पदाची निवड

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार बुधवारी उपनगराध्यक्ष पदाची निवड

वृत्तवेध ऑनलाईन | 17 Oct 2020,
By: Rajendara Salkar 16.40

कोपरगाव : कोपरगाव नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष योगेश बागुल यांनी पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदासाठी बुधवारी (दि.२१) प्रांताधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक कार्यक्रम घेण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक पार पडणार आहे.

कोपरगाव नगरपरिषदेवर माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली भाजप व शिवसेनेचा एक गट यांची एकहाती सत्ता असून उपनगराध्यक्ष पदाची बिनविरोध निवड होईल असे जवळपास निश्‍चित आहे. त्यामुळे या पदासाठी अनेकजण इच्छुक असले तरी नगरसेवक जनार्दन कदम, आरिफ कुरेशी, स्वप्निल निखाडे, विद्या सोनवणे व सुवर्णा सोनवणे यांची नावे अग्रभागी असल्याची चर्चा आहे. उपनगराध्यक्ष योगेश बागुल यांनी ८ ऑक्टोबर रोजी पदाचा राजीमाना दिला आहे. तेव्हापासून हे पद रिक्त असल्याने जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशान्वये निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.

व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार्‍या या बैठकीत उपनगराध्यक्ष पदासाठी संंबधित उमेदवार अथवा सूचक, अनुमोदक उमेदवारी अर्ज पिठासन अधिकारी प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांच्याकडे प्रत्यक्ष दाखल करतील. अन्य सदस्य व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सभेला हजेरी लावतील अशी माहिती मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी दिली.
दरम्यान, बुधवारी सकाळी ११ वाजता निवड प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. त्यानंतर उमेदवारी अर्जाची छाननी, माघार आणि निकाल असा कार्यक्रम पार पडणार आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page