कोपरगावात डिजिटल नवरात्र उत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद  

कोपरगावात डिजिटल नवरात्र उत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद  

वृत्तवेध ऑनलाईन | 19 Oct 2020,
By: Rajendara Salkar 18.50

कोपरगाव : प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या डिजिटल नवरात्र उत्सवाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत  आहे.

  सण-उत्सव साजरे करण्यावरील बंधने  आजही कायम असल्याने  प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. पुष्पाताई काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार आशुतोष काळे व सौ चैताली काळे  यांच्या संकल्पनेतून यांनी  यावर्षी डिजिटल नवरात्र उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला. महिलांचा वाढता प्रतिसाद पाहता यशस्वी झाला आहे.
  महिलांना एकत्रित न येता देखील दरवर्षी प्रमाणे या नवरात्र उत्सवात सहभागी होता येत असून सोशल मिडीयाच्या माध्यमतून हजारो महिला या डिजिटल नवरात्र उत्सवाशी पहिल्याच दिवशी जोडल्या गेल्या आहेत. महिलांना घरबसल्या कोपरगाव तालुक्यातील सर्व देवींच्या मंदिराची माहिती, नवरात्रीच्या नऊ दिवसांचे धार्मिक महत्व, विविध दुर्गारुपांचे सादरीकरण, कुंकुमआर्चन, देवीचे पाठ, भजन आदी कार्यक्रमाचा लाभ घेता येत आहे. तसेच कोरोना वॉरीअर्स या विषयावर रांगोळी स्पर्धा, नाविन्यपूर्ण उपवासाचे पदार्थ तयार करतांना व्हिडीओ तसेच महिलांचा सर्वात आवडता ‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमात देखील महिलाभगिनी घरबसल्या सहजपणे सहभागी होता येत असल्यामुळे महिला भगिनींमध्ये अतिशय उत्साहाचे वातावरण पसरले आहे. सायंकाळी सात ते आठ या डिजिटल नवरात्र महोत्सवाचा आनंद घेत आहेत.
                   चौकट- डिजिटल नवरात्र उत्सवाचा हजारो महिला घरबसल्या ‘याची देही,याची डोळा’ सोशल मिडीयाच्या माध्यमातून अनुभव घेत आहेत.- सौ. सुधाभाभी ठोळे

Leave a Reply

You cannot copy content of this page