नगर मनमाड महामार्गावर चालक बायकोच्या कपाळाचे कुंकु पुसुन प्रवास करतात -संजय काळे

नगर मनमाड महामार्गावर चालक बायकोच्या कपाळाचे कुंकु पुसुन प्रवास करतात -संजय काळे

कोपरगाव ते कोल्हार केला प्रवास

वृत्तवेध ऑनलाईन | 23 Oct 2020,
By: Rajendara Salkar 18.30

कोपरगाव : नगर-मनमाड महामार्गाची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली असून मोठमोठे खड्डे या रस्त्यावर पडले आहेत दररोज या रस्त्यावरून हजारो वाहने ये-जा करतात शेकडो चालक आपला जीव मुठीत घेऊन नाहीतर बायकोच्या कपाळाचे कुंकु पुसुन वाहने चालवित आहेत. तेंव्हा सदरचा रस्ता तातडीने दुरुस्त करण्यात यावा अशी मागणी सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ते संजय काळे यांनी केली आहे.

श्री काळे यांनी कोपरगाव कोल्हार प्रेक्षणीय पायवाटीचे पर्यटन करण्यासाठी गेले होते . कोपरगाव शहर हद्दीतील केवळ कंबरा एवढ्या खड्ड्यात उभे राहून बसून त्यांनी या रस्त्याचे छायाचित्र काढले..

महाराष्ट्र शासनाने पुर्वी ग्रामीण भागात रस्त्यावर लाकडी चाकाच्या बैलगाड्या जाऊन पडणाऱ्या आसाऱ्यांचा राज्य महामार्गावर अनुभव दिला.. कोपरगाव ते कोल्हार शासनाच्या अवकृपेने असे अनेक प्रेक्षणीय खड्डे व त्याचे फोटोग्राफ श्री काळे यांनी काढून संबंधित विभागाला पाठवले आहेत.

भारतात ह्या मौत का कुआ रस्त़्यावर गाड्या चालवणारे dare devil drivers चालक मी आपणास दाखवणार आहे. हे चालक ह्या रस्त्यावर प्रवास करताना बायकोच्या कपाळाचे कुंकु पुसुन प्रवास करतात. त्याबाबत श्री काळे यांनी त्याचा निषेध भ्रष्ट व चिल्लर शासनाचा व निष्क्रिय लोकप्रतिनिधींचा निषेध व्यक्त केला आहे. याबाबत तातडीने केल्या आपण तीव्र आंदोलन छेडणार असल्याचे संजय भास्करराव काळे यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page