परतीच्या पावसाच्या तडाख्याने शेतात आडवा झालेला  ऊस दोन्ही कारखान्याने  प्राधान्याने गाळपासाठी  न्यावा – शिवाजी ठाकरे 

परतीच्या पावसाच्या तडाख्याने शेतात आडवा झालेला  ऊस दोन्ही कारखान्याने  प्राधान्याने गाळपासाठी  न्यावा – शिवाजी ठाकरे 

वृत्तवेध ऑनलाईन | 25 Oct 2020,
By: Rajendara Salkar 13.40

कोपरगाव :  अतिवृष्टीमुळे राज्यात सर्वत्र शेतक-यांचे झालेले नुकसान पाहता राज्य सरकारनं आज 10000 कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा केली. केली आहे परंतु ही मदत मिळेल तेंव्हा मिळेल तत्पूर्वी परतीच्या पावसाने शेतात आडवा झालेला ऊस दोन्ही कारखान्यांनी  प्राधान्याने गाळपासाठी न्यावा अशी मागणी शिवसेनेचे तालुकाप्रमुख शिवाजी ठाकरे यांनी केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतपिकासाठी हेक्टरी १० हजार रुपये तर फळपीकासाठी हेक्टरी २५ हजार रुपये मदत जाहीर केली. त्याशिवाय नुकसानग्रस्त भागातल्या पायाभूत सुविधांसाठी आर्थिक मदतही राज्य सरकार करेल.
ही मदत दिवाळीच्या आत शेतकऱ्यांना मिळेल असंही ठाकरे म्हणाले. पण प्रश्न हा आहे की पंचनामे सरकारी कागदी घोडे या सर्वांचा विचार करता, तसेच  ज्या आर्थिक चणचणीच्या स्थितीत राज्य सध्या आहेत, त्यात एवढी मोठी रक्कम सरकार कशी उभारणार? त्यामुळे  ती सरकारी मदत मिळेल तेंव्हा मिळेल  नुकतेच दोन्ही कारखान्यांचे बॉयलर पेटले आहे. तेव्हा येत्या पंधरा वीस दिवसात गाळप हंगाम सुरू होणार आहे. तेव्हा  अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांचा उभा ऊस  शेतात पडला आहे यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून हातातोंडाशी आलेला घास हिरावून जाण्याची शक्यता आहे. तेंव्हा या परिस्थितीत शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी  तो उस ज्या कारखान्याकडे  नोंदविला आहे. त्या कारखान्याने तातडीने  गाळपासाठी न्यावा कारण त्यामुळे थोडेबहुत का होईना शेतकऱ्याच्या हातात पैसे पडणार आहे. बर विशेष म्हणजे हा निर्णय कारखाना स्तरावरील असल्याने निर्णय घेण्यास कुठलीही अडचण येणार नाही. अन्यथा उशीर झाल्यास   पडलेल्या उसाला उंदीर घुशी लागून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे  तेंव्हा केवळ सरकारी अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे आदेश देऊन भागणार नाही. या बाबीचा दोन्ही कारखान्यांनी गांभीर्याने विचार करावा असेही ठाकरे यांनी म्हटले असून ज्या शेतकऱ्यांच्या उस अतिवृष्टीमुळे शेतात पडलेला आहे त्या शेतकऱ्यांनी कारखान्याकडे तातडीने   ऊस गाळपासाठी नेण्याची मागणी  अर्ज आपली नोंद असलेल्या  कारखान्याकडे करावा असे आवाहनही शिवाजी ठाकरे यांनी केले आहे .  

Leave a Reply

You cannot copy content of this page