भावपूर्ण श्रद्धांजली
वृत्तवेध ऑनलाईन | 3Nov 2020
By:Rajendra Salkar, 18:00
गुलाब बाई डागा यांचे निधन
कोपरगाव: येथील माहेश्वरी समाजाच्या ज्येष्ठ महिला कार्यकर्त्या गुलाबबाई श्रीराम डागा वय ८७ यांचे वृद्धापकाळाने निधन झाले त्यांच्यामागे पती श्रीराम डागा मुले श्यामसुंदर वकील श्रीनिवास, नंदकिशोर, राजेंद्र, प्रदीप व विनोद अशी सहा मुले नातू पणतू असा परिवार आहे. स्वर्गीय गुलाबबाई यांना अनेकांनी श्रद्धांजली वाहिली.
देवयानी पाटणी यांचे निधन
कोपरगाव : येथील दिगंबर जैन समाजाच्या महिला कार्यकर्त्या सौ देवयानी गजकुमार पाटणी वय ७० यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले त्यांच्या मागे तीन मुले नातू पणतू असा परिवार आहे जितेंद्र पाटणी यांच्या त्या मातोश्री होत स्वर्गीय देवयानी पाटणी यांना अनेकांनी श्रद्धांजली अर्पण केली.
विजय जोरी यांचे निधन
कोपरगाव : येथील पीपल्स बँकेचे माजी कर्मचारी व मंगलाष्टक फेम विजय श्रीरंग जोरी वय ६७ यांचे अल्पशा आजाराने नाशिक येथे निधन झाले त्यांच्या मागे पत्नी एक मुलगा दोन मुली एक बंधू नातू पणतू असा परिवार आहे चाळीस वर्ष येथील पीपल्स बँकेत यांनी लिपिक कॅशियर आदी पदांवर त्यांनी काम केले होते .मंगलाष्टक म्हणण्यात त्यांचा हातखंडा होता. स्वर्गीय जोरी यांना अनेकांनी श्रद्धांजली वाहिली
Post Views:
607