आत्मा मालिक १०९ विद्यार्थ्यांसह शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात अव्वल स्थानी.
In the scholarship examination
राहुल कोकरे, ओमकार कोकरे, विजय कापडी, सौरभ थोरात, दुर्गेश चव्हाण यांची राज्य गुणवत्ता यादीत निवड.
शहरी व ग्रामिण अशा दोन्ही विभागा मिळून सर्वाधिक विद्यार्थी गुणवत्ता यादीत येण्याची आत्मा मालिक हॅट्ट्रिक .
वृत्तवेध ऑनलाइन।Wed 25Nov2020, By:RajendraSalkar,18:00
कोपरगांव : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे, आयोजित पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत आत्मा मालिक शैक्षणिक संकुलाच्या आत्मा मालिक माध्यमिक व उच्च माध्यमिक गुरुकुलाच्या १०९ विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीमध्ये निवड झाली आहे. यामध्ये पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत २८ तर पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत ८१ विद्यार्थ्यांची निवड झाली. यामध्ये राज्यातील २४ हजार शाळांमधील विद्यार्थी प्रविष्ठ झालेले होते. त्यात सलग तिस-या वर्षी आत्मा मालिक माध्य. गुरुकुलाचे सर्वाधिक विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले. तर द्वितीयस्थानी वसुंधरा प्राथमिक विद्यालय, आष्टी हे आहे. शिष्यवृत्ती परीक्षेतील हे यश शिक्षकांची अपार मेहनत, विद्यार्थ्यांचे संपूर्ण समर्पन आणि आत्मा मालिक पॅटर्न अंतर्गत राबविण्यात आलेले विविध उपक्रम यांची फलश्रृती असल्याची प्रतिक्रिया प्राचार्य निरंजन डांगे यांनी दिली.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये राहुल कोकरे राज्यात ८ वा व जिल्हयात पहिला, ओमकार कोकरे राज्यात १२ वा, विजय कापडी राज्यात १४ वा, सौरभ थोरात राज्यात १४ वा तर दुर्गेश चव्हाण राज्यात १० वा. क्रमांकावर स्थान मिळविले.
विद्यार्थ्यांना प्राचार्य निरंजन डांगे, विभाग प्रमुख रमेश कालेकर, सागर अहिरे, मिना चव्हाण, सचिन डांगे, पर्यवेक्षक अनिल सोनवणे, बाळासाहेब कराळे, रविंद्र देठे, सुनिल पाटील विषय शिक्षक अनिल सोनवणे, दिपक चौधरी, प्रियंका चौधरी, संतोश भांड, रुपाली होन, कोमल जगताप, राहुल जाधव, अनिता कोल्हे, रविंद्र धावडे, गणेश रासने, किशोर बडाख, मनोज वैद्य, नितीन अनाप, प्रशांत कर्पे, वनिता एखंडे, मिना जाधव, रोहिणी सुर्यवंशी, इंदू बहिरम यांचे मार्गदर्शन लाभले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे प. पु. आत्मा मालिक माऊली, अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी, उपाध्यक्ष भगवानराव दौड, सरचिटणीस हनुमंत भोंगळे, कोषाध्यक्ष विठ्ठलराव होन विश्वस्त प्रभाकर जमधडे, प्रकाश भट, बाळासाहेब गोर्डे, प्रकाश गिरमे, माधवराव देशमुख, शालेय व्यवस्थापक सुधाकर मलिक आदीनी अभिनंदन केले.