१९ महिन्यांची मृत्युची झुंज अखेर संपली.

१९ महिन्यांची मृत्युची झुंज अखेर संपली.

The 19-month-old death struggle is finally over.

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 2Jan 2021, 18:30:00

कोपरगाव : शिक्षण बीएससी ऍग्री, घरची शेतीही उत्तम घेतलेल्या शिक्षणाचा उपयोग आपल्याबरोबर समाजाला द्यावा हा विचार त्याने मनात रुजवला होता, पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते, तालुक्यातील रवंदे येथील प्रशांत बाळासाहेब भुसे  या २६ वर्षीय अविवाहित तरुणावर आई-वडिलांनी उपचारासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले, चेन्नईच्या फोर्टिस रुग्णालयात देशपातळीवरील प्रख्यात तज्ञ डॉ. बाला यांनी हृदय आणि फुप्पुस प्रत्यारोपण केले, पण १९ महिन्यापासून सुरू असलेली प्रशांतची मृत्यूशी झुंज अखेर संपली. त्याचे नुकतेच  निधन झाले.

कै. प्रशांत भुसे ऑक्टोबर २०१८ मध्ये आजारी पडला होता, त्याच्यावर नाशिक, पुणे, मुंबई, हिंदुजा, रुबी हॉस्पिटल आणि त्यानंतर चेन्नईच्या प्रख्यात फोर्टिस रुग्णालयात उपचार केले गेले.   तेथे  तीन महिन्यापासून उपचार घेत होता, त्याच्यावर डॉ. बाला यांनी एकाच वेळी हृदय आणि फूफुस बदलाची शस्त्रक्रिया केली, आई-वडिलांच्या डोळ्यात त्याच्या जीवनाचे आशेचे किरण दिसत होते, पण नियतीला ते मान्य नव्हते.  प्रशांत येवला येथील दराडे महाविद्यालयातून बीएससी ऍग्री उत्तीर्ण झाला होता आईवडिलांनी त्याच्या आजारपणावर कोट्यावधी रुपये खर्च केले पण हाती काहीच लागले नाही. रवंदेवासिय  प्रशांतच्या अकाली निधनाने शोकसागरात बुडाले होते. प्रशांतने काय काय स्वप्न बघितली होती हे त्याला आणि नियतीला दोघांनाच माहीत होते.

Leave a Reply

You cannot copy content of this page