महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांनी घेतला कोपरगाव काँग्रेस पक्षाचा आढावा

महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांनी घेतला कोपरगाव काँग्रेस पक्षाचा आढावा

Revenue Minister Balasaheb Thorat took stock of the Kopargaon Congress party

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 3Jan 2021, 16:30:00

कोपरगाव :  २०२१ या वर्षात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे महसूलमंत्री ना.बाळासाहेब थोरात यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांनी शनिवार दि.२ जानेवारी रोजी संगमनेर येथे कोपरगाव काँग्रेस पक्षाचा आढावा घेतला असल्याची माहिती जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष तुषार पोटे यांनी दिली.

आ.सुधीर तांबे,आ.लहू कानडे,जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके,जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गुजर,युवक जिल्हाध्यक्ष स्मितल वाबळे,संगमनेर न.प च्या नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे,अनुराधा नागवडे यांच्या उपस्थितीत अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटीची प्रत्येक तालुका नुसार आढावा बैठक घेतली. कोपरगाव तालुक्यातील संघटनात्मक बांधणी,आगामी निवडणूक रणनीती,पदाधिकारी विस्तार,वर्षभरातील कार्यक्रम इतर अनेक बाबींवर या बैठकीत चर्चा झाली.

यावेळी जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष तुषार पोटे,तालुकाध्यक्ष नितीन शिंदे,शहराध्यक्ष सुनील साळुंके,तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष विजय जाधव,शब्बीर शेख,सचिव ज्ञानेश्वर भगत,आदिसह पदाधिकारी हजर होते. कोपरगाव तालुक्यात काँग्रेस पक्षाला मानणारा मोठा वर्ग असून काँग्रेसच्या विचारांना जोडलेल्या लोकांपर्यंत प्रत्येक पदाधिकारी तसेच कार्यकर्ता पोहचला पाहिजे,येणाऱ्या वर्षात होणाऱ्या निवडणुका कोपरगाव तालुक्यात काँग्रेस पक्ष संपूर्ण ताकदीने लढवेल,महाविकास आघाडी सरकार संपूर्ण राज्यात यशस्वी घोडदौड करीत असून स्थानिक पातळीवर लोकप्रतिनिधी यांनी काँग्रेस पक्षाला योग्य तो सन्मान दिल्यास महाविकास आघाडीचा विचार करून अन्यथा स्वबळावर लढण्याची संपूर्ण ताकद ठेवा अशा सूचना मंत्री.थोरात यांनी कोपरगाव तालुका व शहर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना दिल्या असल्याचे पोटे यांनी सांगितले.

Leave a Reply

You cannot copy content of this page