कोपरगाव २९ ग्रामपंचायती: ७ जागा बिनविरोध ; आता २७२ जागांसाठी आता ६११ उमेदवार रिंगणात,

कोपरगाव २९ ग्रामपंचायती: ७ जागा बिनविरोध ; आता २७२ जागांसाठी आता ६११ उमेदवार रिंगणात,

Kopargaon 29 Gram Panchayats:  7 seats unopposed; Now 611 candidates are in the fray for 272 seats.

ग्रामपंचायतीसाठी अर्ज मागे घेण्याची वेळ संपली; आता प्रचाराचं धुमशान!

कोपरगाव :कोपरगाव विधानसभा मतदार संघातील २९ ग्रामपंचायतीच्या २७९ जागांसाठी माघाडे माघारीनंतर आता ६११ उमेदवार निवडणूक रिंगणात असून ७ जागा बिनविरोध पैकी पाच महिला व दोन पुरुष यांचा समावेश आहे. यात सांगवी भुसार ग्रामपंचायतीच्या सहा जागा तर जेऊर कुंभारी येथील एका जागेचा समावेश आहे अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार योगेश चंद्रे यांनी दिली आहे.

कोपरगाव मतदारसंघातील २९ ग्रामपंचायतीच्या निवडणुका लाभल्याने उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी ९७५ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते यात ४७२ स्त्रिया ५२३ पुरुषांचा समावेश होता. जमिनीमध्ये अकरा अर्ज अवैध ठरल्याने ९६४ उमेदवार रिंगणात होते आज सोमवार ४ जानेवारी रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत महागारी माघारीचा कालावधी असल्याने ३५३ सदस्य उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने २९ ग्रामपंचायतीच्या २७९ ग्रामपंचायतीसाठी आता ६११ उमेदवार रिंगणात आहेत. तर जेऊर कुंभारी वार्ड नंबर नंबर ३ एसटी महिला पवार सुवर्णा सतीष, सांगवी भुसार वार्ड नंबर १ एसटी पुरुष माळी दीपक नामदेव, सांगवी भुसार वार्ड नंबर १ एसटी महिला माळी सुनंदा भास्कर, सांगवी भुसार वॉर्ड नंबर १ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला शिंदे वंदना नानासाहेब, सांगवी भुसार वार्ड नंबर २ एस सी महिला मेहेरखांब लहानुबाई पुंडलिक, सांगवी भुसार वार्ड नंबर ३ सर्वसाधारण पुरुष कासार मोहन अशोक, वार्ड नंबर ३ सर्वसाधारण महिला जाधव पुष्पा बाबासाहेब हे सातही उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत असेही निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार योगेश चंद्रे यांनी सांगितले आहे.यावेळी निवडणूक निरीक्षक तथा उपविभागीय अधिकारी डॉ.अर्चना पठारे उपस्थित होत्या .सदर निवडणूक प्रक्रिया कामी निवडणूक शाखा अधिकारी अरुण रणनवरे यांचे सह विविध खातेनिहाय कर्मचारी सहाय्य करीत आहेत .

गेल्या आठ दिवसांपासून उमेदवारी मिळण्यासाठी सुरू असलेली सेटिंग… त्यानंतर अर्ज भरण्यासाठी सुरू झालेली धडपड…. नंतर अर्ज मागे घेण्यासाठीची मनधरणी… अमिषांचं गाजर… अशा सर्व गोंधळात अखेर आज अर्ज मागे घेण्याची वेळही संपली आहे. त्यामुळे आता ग्रामपंचायत निवडणुकीचा राज्यभर धुरळा उडणार आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने सख्खे मित्रं, नातेवाईक, कुटुंबातील सदस्य एकमेकांच्या विरोधात लढतानाचे चित्रंही दिसणार आहे. काही ठिकाणी दुरंगी, तिरंगी तर काही ठिकाणी थेट चौरंगी लढत पाहायला मिळणार असून या निवडणुकीत कोण बाजी मारणार? याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागलं आहे.

आज या निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे अनेक पक्षांनी आणि स्थानिक पातळीवरील नेतृत्वाने शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी उमेदवारांची मनधरणी केली. २७९ पैकी केवळ ७ जागा बिनविरोध झाल्या, त्यात काही ठिकाणी यश आले तर काही ठिकाणी यश आलं नाही. त्यामुळे २७२ जागांसाठी निवडणुका अटळ झाल्या आहेत. चिन्ह वाटपाचे काम उशिरापर्यंत सुरू होते

Leave a Reply

You cannot copy content of this page