मंगेश पाटील यांनी कोपरगाव मधील रस्त्यांच्या दुर्देशचा मुद्दा उपस्थित करत नगराध्यक्ष व प्रशासनाला दिला घरचा आहेर.
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 17Jan 2021, 17:30:00
कोपरगाव : कोपरगाव शहराच्या प्रत्येक निवडणुकीच्या रिंगणात कोपरगाव शहराती रस्त्यांचा मुद्दा कायमच चर्चिला गेला आहे. येणाऱ्या कोपरगाव नगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सेना भाजप व राष्ट्रवादीचे नगरसेवक यांच्यात सध्या रस्त्यांच्या कामांच्या निविदा वरून कलगीतुरा सुरू असतानाच माजी नगराध्यक्ष व राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते मंगेश पाटील यांनी कोपरगाव मधील रस्त्यांच्या दुर्देशचा मुद्दा उपस्थित करत नगराध्यक्ष व पालिका प्रशासनाला उपरोधिक टोला लगावत घरचा आहेर दिला आहे .
कोपरगाव मध्ये कोणत्याही बाजूने आल्यानंतर रस्त्यांची दुर्दशा बघवत नाही, अख्ख्या महाराष्ट्रात असे रस्ते कोठे नसतील असे वक्तव्य करत त्यांनी पालिका प्रशासन व नगराध्यक्ष यांना घरचा आहेर दिला. पैसे असतांना देखील रस्ते का होत नाही? रस्ते जर चांगले झाले तर शहराचा कायापालट होऊन व्यापारवृद्धी निश्चितपणे होऊ शकेल मात्र नगरपालिका हे जाणून बुजून करत नसल्याचा आरोप करून नेत्यांनी त्यांच्या परीने मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्याचा विनियोग चांगली कामे करून दाखवण्यात घालवावा. ठरविले तर एका महिन्यात धुळ मुक्ती होऊ शकते, तेव्हा विनाकारण रस्त्यावर पाणी मारून तात्पुरती मलमपट्टी नको असे परखड मतही पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना मांडले रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून सर्वत्र धुळीचे साम्राज्य धुळीमुळे डोळ्यांचे आजार श्वसन विकार मणक्यांचे आजार खड्ड्यांमुळे दुचाकी चारचाकी वाहनांचे होणारे नुकसान यामुळे जनता पुरती वैतागली आहे नगरपालिकेला विविध माध्यमातून मोठ्या प्रमाणावर निधी मिळालेला आहे रस्त्यांच्या निविदा ही काढल्या आहेत. मात्र निष्क्रिय नियोजन असल्यामुळे रस्ते होण्यास तयार नाहीत. नगराध्यक्ष वहाडणे सांगतात निविदा निघाले आहेत लवकरच कामाला सुरुवात होईल मग कामे काढली असा सवाल करून प्रशासन व अधिकार यात ताळमेळ नाही काय ? असा संतप्त सवालही पाटील यांनी उपस्थित केला. यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने धरणे नद्या तुडुंब भरलेले आहेत असे असतानाही नगरपालिका सात दिवसात हिवाळ्यातच पाणीपुरवठा करीत आहेत तरी नागरिकही का गप्प बसले ?नागरिकांना आरोग्य रस्ते व पाणी या आवश्यक बाबी असताना यावरच भर दिला जात नाही हे दुर्दैव म्हणावे लागेल वाहिन्यांच्या खोदाईमुळे आहे ते रस्ते खराब होत आहेत या प्रश्नावर कोणीच बोलायला तयार नाही अथवा नगरपालिका प्रशासन त्याबाबत तातडीने पावले उचलण्यास धजत नाही सर्वसामान्य नागरिक घरपट्टी पाणीपट्टी शैक्षणिक तसेच झाडे लावण्या संदर्भात कररूपाने पैसा भरतो मात्र त्याचा विनियोग चांगला होत नसल्याचे दिसत असल्याची खंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केली. शकेल. नगरपालिकेने नागरिकांच्या जीवाशी न खेळता तातडीने रस्त्याची कामे करून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणीही श्री पाटील यांनी केली. मी काही महिने नगराध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसलो आहे त्यामुळे मला या प्रश्नांची जाण आहे. त्यामुळेच मी पालिका प्रशासनाला याप्रश्नी जबाबदार धरीत आहे. सामाजिक दृष्टिकोन ठेवून कोणतेही राजकारण न करता मीही मागणी करीत असल्याचे पाटील म्हणाले,कोपरगाव तालुक्याला ऐतिहासिक पौराणिक संदर्भ आहेत शैक्षणिक हब मोठ्या प्रमाणात येथे आहे. पालिकेच्या माध्यमातून या सुधारणा जर सातत्याने चालू ठेवल्या तर कोपरगाव हे मुख्यालय होऊ शकते. नगरपालिकेने ठरवले तर एक महिन्याच्या आत रस्ते धूळ मुक्त होऊ शकता असे श्री पाटील यांनी शेवटी पुन्हा एकदा ठणकावून सांगितले. त्यामुळे येत्या नगरपालिका निवडणुकीत रस्त्यांचा मुद्दाही चांगलाच गाजणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.