शासकीय आरोग्य योजना राबविणारे आत्मा मालिक जिल्ह्यात नववे- अमित फरताळे.

शासकीय आरोग्य योजना राबविणारे आत्मा मालिक जिल्ह्यात नववे- अमित फरताळे.

Atma Malik, who is implementing the government health scheme, is the ninth in the state.

२६ जानेवारीला प्रशस्तीपत्रकाने सन्मान

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 18Jan 2021, 16:00:00

कोपरगाव : राज्य शासनाच्या एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना यामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या राज्य आरोग्य सोसायटी अंतर्गत ३४ जिल्ह्यातील २९४ रुग्णालय पात्र ठरले असूनजिल्ह्यातील पहिल्या दहा मध्ये कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील आत्मा मालिक रुग्णालयाचा त्यात नववा क्रमांक आला आहे.

रुग्णालयास प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे असे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर ज्योत्स्ना पडियार यांनी कळवले असल्याची माहिती रुग्णालयाचे कार्यकारी अधिकारी अमित फरताळे यांनी दिली २३ सप्टेंबर २०१८ ते ३० डिसेंबर २०२० कालावधीदरम्यान राष्ट्रीय स्वास्थ प्राधीकरण यांच्या पत्रानुसार २६ जानेवारी रोजी जिल्हा जिल्हा स्तरावर या विविध रुग्णालयांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान केला जाणार आहे. यात राज्यातील अहमदनगर अकोले अमरावती औरंगाबाद बीड भंडारा बुलढाणा चंद्रपूर धुळे गडचिरोली गोंदिया हिंगोली जळगाव जालना कोल्हापूर लातूर मुंबई नागपूर नांदेड नंदुरबार नाशिक उस्मानाबाद परभणी पुणे रायगड रत्नागिरी सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर ठाणे वर्धा वाशीम यवतमाळ या ३४ जिल्ह्यांचा समावेश असून एकूण २९४ रुग्णालयांचा त्यात समावेश आहे नगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट चे आत्मा मालिक रुग्णालय यांचा २९६८ सर्जरी व थेरेपी केल्यामुळे नववा क्रमांक मिळाला आहे पद्मश्री विठ्ठलराव विखे फाऊंडेशन डॉक्टर विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज तीस हजार ३६१ प्रथम प्रवरा रुरल हॉस्पिटल लोणी १२०७० दुसरा श्री साईबाबा संस्थान शिर्डी नऊ हजार ४९० तिसरा आनंद ऋषीजी हॉस्पिटल ७८९७ चौथा गरुड हॉस्पिटल आणि कॅन्सर सेंटर ५ हजार २८३पाचवा तांबे हॉस्पिटल ४ हजार ९९८ सहावा साईदीप हॉस्पिटल १५६९ सातवा स्वास्थ्य हॉस्पिटल व मेडिकल रिसर्च सेंटर ३५५९ पाठवा विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट आत्मा मालिक रुग्णालय २९६८ ९ वा व सिविल हॉस्पिटल अहमदनगर ११८१ १० वा क्रमांक मिळाला आहे २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या रुग्णालयांना राज्य आरोग्य हमी सोसायटीचे जिल्हा समन्वयक क्षेत्रीय व्यवस्थापक यांच्या उपस्थित प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान केला जाणार असून या उपक्रमामुळे त्यांच्या कामाची दखल घेतल्याने आणखीन उत्तम काम करण्यासाठी निश्चितच प्रोत्साहन मिळणार असून इतर रुग्णालयांना सुद्धा या योजनेमध्ये कामगिरी सुधारण्याची प्रेरणा मिळेल.

Leave a Reply

You cannot copy content of this page