कोपरगाव २९ ग्रामपंचायत निवडणूक निकाल : २० ग्रामपंचायती कोल्हे, ६ काळे व प्रत्येकी एक- एक ग्रामपंचायत महाविकास आघाडी, परजणे व जाधव गटाकडे
Gram Panchayat Election Results
कोपरगाव विधानसभा मतदारसंघ ३२ ग्रामपंचायतीं पैकी २२ कोल्हे , ६ काळे , प्रत्येकी एकेक काळे विखे, महाविकास आघाडीकडे, परजणे राजेंद्र जाधव गटाकडे
सत्तांतर मळेगाव थडी रवंदे वेळापूर नाटेगाव कासली कोल्हे गटाने खेचून आणली तर कोकमठाण ग्रामपंचायत महाविकास आघाडीने व,हिंगणी काळे गटाने खेचली, संवत्सर ग्रामपंचायत राखण्यात परजणे गटाला यश व सांगवी भुसार जाधव यांच्याकडे
कोपरगाव : कोपरगाव २९ ग्रामपंचायत निवडणूक निकाल : २० ग्रामपंचायती कोल्हे, ६ काळे व प्रत्येकी एक ग्रामपंचायत महाविकास आघाडी,परजणे व जाधव गटाकडे आली आहे. सत्तांतर मळेगाव थडी, रवंदे, वेळापूर, नाटेगाव, कासली कोल्हे गटाने खेचून आणली तर कोकमठाण ग्रामपंचायत महाविकास आघाडीने व,हिंगणी काळे गटाने खेचली, संवत्सर ग्रामपंचायत राखण्यात परजणे गटाला यश व सांगवी भुसार जाधव यांच्याकडे आली आहे.
कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचा विचार करता निवडणूक झालेल्या ३२ ग्रामपंचायतीं पैकी २२ ग्रामपंचायती कोल्हे गटाकडे, ६ ग्रामपंचायती काळे गटाकडे, जळगाव ग्रामपंचायत काळे विखे गटाकडे, कोकमठाण ग्रामपंचायत महाविकास आघाडीकडे, संवत्सर परजणे गटाकडे तर सांगवी भुसार राजेंद्र जाधव यांच्याकडे आली आहे.
ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या मतमोजणीला आज सोमवारी सकाळी दहा वाजता सुरुवात झाली. मतमोजणी तहसिलदार कचेरी प्रांगणातील मंडपात सुरू झाली तेंव्हा मतमोजणी केंद्राबाहेर नागरिकांची गर्दी झाली होती. अंतिम निकाल दीड वाजेपर्यंत जाहीर झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार कोपरगाव तालुक्यातील २९ ग्रामपंचायतीचे निवडणूक निकाल जाहीर झाले असून यात २० ग्रामपंचायती कोल्हे गटाकडे, ६ ग्रामपंचायती काळे गटाकडे व कोकमठाण ग्रामपंचायत महा विकास आघाडीकडे तर प्रत्येकी एक -एक ग्रामपंचायत परजणे व जाधव गटाकडे गेली आहे. महत्वाचे म्हणजे गेल्या पाच वर्षानंतर काळे गटाकडे असलेल्या मळेगाव थडी, रवंदे, वेळापूर, नाटेगाव, कासली पाच ग्रामपंचायती कोल्हे गटाने खेचून आणि या ठिकाणी सत्तांतर झाले आहे तर कोल्हे गटाच्या ताब्यात असलेल्या कोकमठाण ग्रामपंचायत महाविकास आघाडीने व,हिंगणी ग्रामपंचायत काळे गटाने आपल्याकडे खेचून आणल्याने याठिकाणी सत्तांतर झाले आहे. संवत्सर ग्रामपंचायत राखण्यात परजणे गटाला यश आले असले तरी मागच्या निवडणुकीच्या तुलनेत तीन जागा त्यांना गमवाव्या लागल्या आहेत यात कोल्हे गटाने दोन जागा व काळे यांनी एक जागा पटकावली आहे. व सांगवी भुसार ग्रामपंचायतीच्या ९ जागांपैकी राजेंद्र जाधव यांनी सहा जागा बिनविरोध घडवून आणल्याने आपल्याकडे राखण्यात यश मिळविले तर निवडणूक झालेल्या उर्वरित तीन जागांपैकी गटाने दोन जागा कोल्हे गटाने व एक जागा काळे गटाने पटकावली आहे.
पवार सुवर्णा सतीष, माळी दीपक नामदेव, माळी सुनंदा भास्कर, शिंदे वंदना नानासाहेब, मेहेरखांब लहानुबाई पुंडलिक, कासार मोहन अशोक, जाधव पुष्पा बाबासाहेब हे सातही उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.
कोल्हे गटाकडे या ग्रामपंचायती तर
१) येसगाव (०९ कोल्हे गट) ,(०२ काळे गट) ,
,२) टाकळी( ०८कोल्हे गट) ,(०१ काळे गट) ,
,३) काकडी,( ०८कोल्हे गट) ,( ०३काळे गट) ,
४) जेऊर कुंभारी,( ०७कोल्हे गट) ,( ०३काळे गट) ,५)सोनारी,( ०४कोल्हे गट) ,( ०३काळे गट) ,६)वेळापूर ,( ०६कोल्हे गट) ,( ०४काळे गट) ,७)ओगदी ,( ०४ कोल्हे गट) ,( ०३काळे गट) ,८)आपेगाव ,( ०४कोल्हे गट) ,( ०३काळे गट) ,९)अंचलगाव,( ०६कोल्हे गट) ,( ०१काळे गट) ,१०) नाटेगाव ,( ०७कोल्हे गट) ( ०२काळे गट) ,११)उक्कडगाव ,( ०५कोल्हे गट) ,( ०४काळे गट) ,१२)मळेगाव थडी ,( ०८कोल्हे गट) ,( ०३काळे गट) ,१३)अंजनापुर ,( ०८कोल्हे गट) ,( ०३काळे गट) ,
१४)मनेगाव ,( ०५कोल्हे गट) ,( ०२काळे गट) ,
१५)रवंदे ,( १०कोल्हे गट) ,( ०३काळे गट) ,
१६)देर्डेचांदवड,( ०७कोल्हे गट) ,( ०२काळे गट) ,१७)जेऊर पाटोदा,( ०६कोल्हे गट) ,( ०५काळे गट) , १८)धोंडेवाडी,( ०५कोल्हे गट) ,( ०२काळे गट) ,(०१अपक्ष) १९)घारी,( ०५कोल्हे गट) ,( ०४काळे गट), २०)कासली,( ०५कोल्हे गट) ,( ०३ काळे गट) ,(०१अपक्ष)
२१)शिंगवे ,( ०८कोल्हे गट) ,( ०३ काळे गट) ,
२२)रामपुरवाडी,( ०६कोल्हे गट) ,( ०५ काळे गट) ,
काळे गटाकडे या ग्रामपंचायती
१) तिळवणी( ००कोल्हे गट) ,( ०७काळे गट) ,
२), हिंगणी( ०२कोल्हे गट) ,( ०५काळे गट) ,३)कोळगाव थडी(०२ कोल्हे गट) ,(०७ काळे गट) ,४) मढी बुद्रुक (०३ कोल्हे गट) ,(०३ काळे गट) ,५)मढी खुर्द(०४ कोल्हे गट) ,(०५ काळे गट) , ६)मायगाव देवी (०० कोल्हे गट) ,(०९ काळे गट) ,
प्रत्येकी स्वतंत्र आलेल्या एक एक ग्रामपंचायती
१) परजणे गटाकडे एकमेव संवत्सर (१४ परजणे गट) ,( ०१ काळे गट) ,( ०२ कोल्हे गट) , २) कोकणठाण (०२ कोल्हे गट) ,(१५ महा विकास आघाडी) , ३) सांगवी भुसार,( ०२कोल्हे गट) ,( ०१ काळे गट) , (०६ जाधव गट) ४) जळगाव ग्रामपंचायत (०८काळे विखे गट), (कोल्हेगट०३), याप्रमाणे गटाचे उमेदवार विजयी झाले आहेत.