नागपुर – मुंबई महामार्गावरील दिशादर्शक फलक गायब

नागपुर – मुंबई महामार्गावरील दिशादर्शक फलक गायब

Signs missing on Nagpur-Mumbai highway

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 28Jan 2021, 10:30

कोपरगाव : नागपुर – मुंबई मार्गावर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे वतीने कोपरगावजवळील पुणतांबा चौफुली फाटा येथे प्रवेशद्वारावर लावण्यात आलेल्या महत्वाच्या शहरांच्या नावांचे दिशादर्शक फलक वर्ष-दीड वर्ष पासून गायबच झाले आहेत. यामुळे नवीन वाहनचालकांचा गोंधळ उडतो.
त्याबाबत मात्र संबंधित खात्याचे अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. तेंव्हा संबंधित प्रशासनाने येथे लवकरात लवकर दिशादर्शक फलक बसवावा.

याबाबतची अधिक माहिती अशी की, कोपरगाव शहराजवळ नगर-मनमाड महामार्गालगत पुणतांबा चौफुली फाटा असून एक रस्ता आंतरराष्ट्रीय साईबाबांच्या शिर्डी व नगर कडे जातो दुसरा रस्ता झगडे फाटा नाशिक तसेच संगमनेर कडे जातो एक रस्ता सवत्सर वैजापूर औरंगाबाद कडे जातो रस्ता मध्यंतरी अत्यंत खराब झाला होता आता हा रस्ता चांगला झाला आहे मात्र महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने लावण्यात आलेले गावाचे किलोमीटर अंतर व नाव असलेले फलक कोणीतरी अज्ञातानी काढून तोडून टाकल्याचे गेल्या वर्ष दीड वर्षापासून दिसत आहे मात्र हजारो गाड्या लोकप्रतिनिधी या रस्त्यावरून ये जा करतात तो फलकही पाहतात मात्र त्याबद्दल कोणीही तक्रार आत्ता पर्यंत केलेली नाही अथवा त्याची दुरुस्तीही करण्याची तसदी संबंधित खात्याने घेतलेली नाही नागपूर वर्धा कारंजा सिंदखेड राजा जालना औरंगाबाद लोणार आधी महत्त्वांच्या शहरांचे किलोमीटर अंतर त्यावर दर्शविलेले असताना नेमके तेच फलक गायब झाल्याने कोणत्या गावाची किती अंतर आहे हे समजत नाही त्याबाबत आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे संबंधित विभागाने त्वरित त्याची दखल घेऊन हे फलक नव्याने बसवावे अशी मागणी साई भक्तांकडून होत आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page