शिवजयंती :  कोपरगाव आजी- माजी शहरप्रमुखांच्या मदतीने वृद्धाला नवी दृष्टी मिळाली, 

शिवजयंती :  कोपरगाव आजी- माजी शहरप्रमुखांच्या मदतीने वृद्धाला नवी दृष्टी मिळाली, 

Shiva Jayanti: With the help of Kopargaon Aji-Maji Shaharpramukh , the old man got sight

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 25Feb 2021, 14:30

कोपरगाव : कोपरगाव शहरातील आजी-माजी शिवसेना शहरप्रमुख यांनी शिवजयंतीचे औचित्य साधून आर्थिक मदत करून स्थानिक नेत्रालयाच्या सहकार्याने गुरु नावाच्या ८५ वर्षाच्या निराधार  वयोवृद्धांच्या  डोळ्याची मोफत शस्त्रक्रिया केल्याने वृद्धाला नवी दृष्टी मिळाली,

निराधार असलेले सुधाकर वखारे उर्फ गुरु हे  कित्येक वर्षापासून कोपरगाव शहरामध्ये लहानसान छोटी मोठी कामे करून आपला उदरनिर्वाह करीत असतात  परंतु गेल्या १५ वर्षापासून त्यांची दृष्टी क्षीण होत गेली.  त्यांना दिसण्याचा त्रास  होत होता. लोक डाऊन च्या काळात त्यांची मोठी उपासमार झाली  ही बाब शिवसेना शहर प्रमुख कलविंदरसिंग दडियाल यांच्या  लक्षात आली.  त्यांनी गुरु यांना प्राथमिक तपासणी साठी कोपरगाव येथील खाजगी  नेत्र तपासणी सेंटर येथे त्यांच्या डोळ्याची  तपासणी केली.
नेत्ररोग तज्ञांशी चर्चा केली व  आमच्या सकारात्मक प्रतिक्रिया नंतर शस्त्रक्रियेचा निर्णय घेण्यात आला. याबाबत जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांच्याशी चर्चा करून शहर प्रमुख यांनी १९ फेब्रुवारी २०२१ हा शिवजयंतीचा मुहूर्त निश्चित केला. रुग्णालयाचा खर्च शहरप्रमुख कलविंदरसिंग दडियाल यांनी उचलला, तर स्वतःचे औषधालय असलेले माजी शहरप्रमुख भरत मोरे यांनी औषधांचा खर्च उचलला,डॉ. तेजश्री अमित नाईकवाडे व डॉ. प्रशांत सलगिले यांनी अवघड अशी नेत्र शस्त्रक्रिया यशस्वी करून त्यांना नेत्रज्योत देऊन त्यांच्या जिवनात नवीन प्रकाश फुलविल्याने  ही रंगबिरंगी दुनिया पुन्हा या वृध्दास पहावयास मिळत आहे. 
गुरूच्या  चेहऱ्यावरील हास्य व आनंद
पाहून याबाबत नेत्रालयाचे चांगदेव कातकडे व डॉ. प्रसाद कातकडे  यांनी अशा असहाय्य व्यक्तींची मदत करण्याचा उद्देश यानिमित्ताने सफल झाल्याची भावना व्यक्त केली. यापुढेही ही कामे करण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला आहे.
 शस्रक्रियेनंतर गुरूला बऱ्यापैकी दिसू लागले. आता त्या कुणाचाही आधार न घेता ते चालू शकतात. नवीन दृष्टी मिळाल्यानंतर गुरुच्या  चेहऱ्यावरचा आनंद हा पाहण्यासारखा आहे. याकामी कुकुशेठ सहानी व चेतन खुबाणी यांनी चांगल्या प्रकारे मदत केली. शिवजयंतीचे औचित्य साधून एका वयोवृद्ध झाला नवी दृष्टी मिळवून दिल्याबद्दल शिवसेनेच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page