कोपरगांव पाथरवट समाजाचे वतीने भगवान विश्वकर्मा जयंती साजरी.
Celebration of Lord Vishwakarma Jayanti on behalf of Kopargaon Patharvat Samaj.
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 26Feb 2021, 16:00
कोपरगांव : येथील पाथरवट समाजाचे वतीने सृष्टीचे रचनाकार, देवांचे शिल्पकार, वास्तू शिल्पकारांची देवता “श्री भगवान विश्वकर्मा” यांची जयंती लॉकडाउनचे सर्व नियम पाळून साजरी करण्यात आली. सौ.सविता व श्री.महेंद्र टोरपे या उभयतांचे हस्ते पूजन व उपस्थितांना प्रसाद वाटप करण्यात आला.
महिला आघाडी अध्यक्षा सौ.राजश्री टोरपे यांनी यु-ट्यूबच्या माध्यमातून विश्वकर्मा पूजा व आरतीचे नियोजन केले. रविंद्र भगत यांनी प्रास्ताविक केले. अध्यक्ष संजय धानके, उपाध्यक्ष कल्पेश टोरपे, प्रताप केने, महेंद्र टोरपे, अक्षीता आमले यांचे समयोचित भाषणे झाली. परशुराम टोरपे यांनी सूत्रसंचालन केले. अनिल आमले, अनिल टोरपे, अनिल भोईर, सागर टोरपे, महेश डोंगरे, हेमंत भोईर, अभय गगे, सुनील गगे, लक्ष्मण आमले आदींच्या परिश्रमाने कार्यक्रम यशस्वी झाला अशी माहिती अध्यक्ष संजय धानके यांनी दिली.