प्रवास होणार सुखकर! नागपुर हायवेच्या पुणतांबा फाटा ते तळेगाव मळे मार्गासाठी तब्बल १७ तब्बल १७ कोटींचा रस्ता पूर्णत्वास

प्रवास होणार सुखकर! नागपुर हायवेच्या पुणतांबा फाटा ते तळेगाव मळे मार्गासाठी तब्बल १७ तब्बल १७ कोटींचा रस्ता पूर्णत्वास

The journey will be pleasant! 17 crore road from Puntamba Fata to Talegaon Male on Nagpur Highway completed

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 9March 2021, 17 :20

 कोपरगाव : गेली कित्येक वर्षांपासून दुर्लक्षित असणारा नागपुर मुंबई ते जलद मार्गावरील पुणतांबा फाटा ते तळेगाव मळे या रस्त्याचा प्रश्न सोडविण्यासाठी तात्कालीन लोकप्रतिनिधींनी योग्यवेळी कार्यतत्परता दाखवल्याने वाहनधारक व शेतकऱ्यांची परवड आता थांबणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासूनचा प्रश्न सुटणार असल्याने या मार्गावरचा प्रवास आता सुखकर होणार असल्याचे युवक कार्यकर्ते गोरख टुपके यांनी सांगितले. पूर्व भागातील नागरिकांकडून ना. नितीन गडकरी व सौ स्नेहलता कोल्हे यांचे आभार .

देशाच्या विकासात रस्तेही महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. चांगले रस्ते असल्यास वेगाने दळणवळण होते. यामुळे चांगले रस्ते नेहमीच विकासात हातभार लावतात. कोपरगाव तालुक्यातूनही अनेक राष्ट्रीय महामार्ग जात आहेत.यात अहमदनगर व औरंगाबाद जिल्हयाला जोडणा-या व समृद्धी महामार्ग मुळे दुर्लक्षित झालेल्या मुंबई नागपूर जलद महामार्गाची अत्यंत दुरवस्था झाली होती. या संदर्भात पुर्व भागातील विविध गावातील ग्रामस्थांनी तत्कालीन आमदार सौ स्नेहलता कोल्हे यांचेकडे मागणी केली होती.

त्यानुसार केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्री नामदार नितीन गडकरी यांचे बरोबर सौ कोल्हे यांनी पत्रव्यवहार केला. त्यानुसार प्रमुख राज्य मार्ग १२ पुणतांबा फाटा ते तळेगाव मळे, जिल्हा हदद या सुमारेया सुमारे २१.५०० किलोमीटरच्या रस्त्याचे डांबरीकरण कामासाठी १७ कोटीचा निधी उपलब्ध करून दिला. कोपरगाव मतदार संघामध्ये विविध रस्त्यांचे कामी मार्गी लावुन आपल्या कामाने वेगळा ठसा उमटविलेल्या सौ. स्नेहलता कोल्हे म्हणाल्या, नागपुर मुंबई समृद्धी महामार्ग झाला तरी या मुंबई नागपूर जलद महामार्गाचा दर्जा सेवा रस्त्याचा राहील आणि स्थानिक गावांचे महत्व देखील कमी होणार नाही असेही सौ. कोल्हे म्हणाल्या.यांच्या पाठपुराव्यामुळे या रस्त्याचे काम मार्गी लागल्याने या पूर्व भागातील नागरीकांत समाधानाचे वातावरण आहे .

Leave a Reply

You cannot copy content of this page