अभिमानास्पद! सौ. सारिका भुतडा ठरली समताची सुपर वुमन
Proud! Sarika Bhutada became a super woman of Samata
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 9March 2021, 19 :30
कोपरगाव : जागतिक महिलादिनी समता पतसंस्था व समता इंटरनॅशनल स्कूल वतीने ‘कौन बनेगी समता सुपर वुमन २०२१-२२’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.सौ. सारिका कैलास भुतडा ठरली समताची सुपर वुमन
या स्पर्धेत प्रामुख्याने कोपरगाव, वैजापूर, येवला,राहाता, शिर्डी, श्रीरामपूर तालुक्यातील वयोगटातील स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता.
या स्पर्धेत सौ. सारिका कैलास भुतडा यांनी प्रथम,डॉ.मधुरा निहार जोशी यांनी द्वितीय तर डॉ.अपर्णा अतिश काळे यांनी तृतीय क्रमांक, सौ. रश्मी ऋषिकेश भडकवाडे यांनी चौथा, सौ.निशा सचिन गवारे यांनी पाचवा, तर सौ.अश्विनी जितेंद्र लिप्टे यांनी सहावा क्रमांक मिळविला. विजयी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे व सहभाग प्रमाणपत्रे देण्यात आली. फेसबुक द्वारे लाईव्ह स्पर्धा दाखविण्यात आली होती परिसरातील हजारो नागरिकांना लाईव्ह प्रक्षेपनाद्वारे स्पर्धा पाहण्याची संधी मिळाली. प्रसंगी सौ.शैलजा रोहम, सौ.अनिता जपे, सौ.खुशबू बंब (सी.ए), सौ.किरण भन्साळी, डॉ.पूजा कातकडे, सौ.प्रीती सत्यजीत कदम, डॉ.प्रियांका कोठारी, सौ.समीना अंजुम शेख,सौ.कल्पना सतीश अजमेरा, सौ.किरण दगडे, सौ.कोमल न्याती आदि महिलांनी सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल समता स्कुलच्या मॅनेजिंग ट्रस्टी सौ.स्वाती कोयटे, शालेय पोषण आहार समितीच्या अध्यक्षा सौ.सुहासिनी कोयटे, सौ.श्वेता अजमेरा सौ.जोत्स्ना पटेल, सौ.प्रीती शहा, सौ.रोहिणी शिरोडे, सौ.वंदना होडे यांच्या हस्ते यथोचित सत्कार करून सन्मान करण्यात आला. समता स्कूलच्या शैक्षणिक संचालिका सौ.लिसा बर्धन म्हणाल्या कि, ‘समता पतसंस्था आणि समता स्कूल सतत नवनवीन उपक्रम राबवत असते. त्यातीलच जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ‘कौन बनेगी समता सुपर वुमन २०२१-२२’ स्पर्धेतील महिलांच्या विचारांना चालना देऊन विचार प्रकटीकरणासाठी एक उत्तम संधी प्राप्त करून दिली आहे. त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा व स्वतःमधील कौशल्य वाढीस चालना द्यावी.’ सांस्कृतिक विभाग प्रमुख श्रीमती विभावरी नगरकर स्पर्धकांना नियमांची माहिती दिली स्पर्धेचे गुणांकन करण्याचे महत्वाचे काम सौ.लिसा बर्धन,श्री. विलास भागडे, श्री.समीर अत्तार यांनी केले. समतासमुहाचे संस्थापक काका कोयटे, संचालक संदीप कोयटे, गुलशन होडे, यांची प्रमुख उपस्थिती होती. सुत्रसंचालन कु.सानिका निर्मल यांनी केले. स्पर्धा यशस्वितेसाठी समता इंटरनॅशनल स्कूलचे शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, नागरिकांचा प्रत्यक्ष आणि प्रसार माध्यमांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.